Neeyat Movie Review:  आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan) . अनेक चित्रपट हे कोणत्याही हिरोशिवाय फक्त विद्या बालन या अभिनेत्रीच्या नावावर चालतात. जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा दिमखदार एन्ट्री घेत विद्या बालन हिने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. या चित्रपटाचं त्रिकूट म्हणजेच विद्या बालन, दिग्दर्शक अनु मेनन आणि निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी याआधी शकुंतला देवी यासारख्या चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. 


या त्रिकूटाने 'नियत' हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटाची गोष्ट एक मर्डर मिस्ट्री आहे. व्यावसायिक आशिष कपूर हे पात्र साकरणारा अभिनेता राम कपूर आपल्या वाढदिवसासाठी एका पार्टीचे आयोजन करतो. ही पार्टी तो स्कॉटलँडमधील एका समुद्राच्या किनारी प्रशस्त अशा बंगल्यामध्ये आयोजित करण्यात येतो. परंतु आशिष कपूर या पात्राची हत्या होते आणि या गोष्टीला एक नवं वळण मिळतं. त्यानंतर सीबीआय ऑफिसर म्हणून विद्या बालनची धमाकेदार एन्ट्री होते. विद्या बालन ही मिरा राव हिच्या भूमिकेमध्ये आहे. त्यानंतर या चित्रपटामध्ये अनेक घटनांचा उलघडा होतो. त्यामुळे हा सस्पेन्स जर अनुभवायचा असेल तर हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला हवा. 


या चित्रपटामध्ये विद्याच्या अभिनयन नेहमीप्रमाणे उत्तम आहे. तिने तिचं पात्र अनेक वेगवेगळ्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न केला आहे. विद्याचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्यामुळे विद्याच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहणं योग्य ठरणार आहे. या चित्रपटामध्ये राम कपूरचा अभिनयाने ठिक आहे. परंतु राहुल बोस हा त्याचं पात्र साकरताना थोडं कमी पडल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच इतर कलाकरांनी म्हणजेच निरज काबी, दीपानिता शर्मा, शहाना गोस्वामी, निकी अनेजा, शशांक अरोरा यांनी देखील त्यांच्या पात्रांना योग्य न्याय दिल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मिडियास्टार प्राजक्ता कोळी अर्थातच मोस्टलीसेन हिने देखील या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. 


कुठेतरी या चित्रपटाची गोष्ट हॉलीवूडमधील एका गुप्तहेर चित्रपटाप्रमाणे वाटते. चित्रपटामधील काही सीन्स हे खूप चांगल्या पद्धतीने दिग्दर्शित करण्यात आले आहेत. पण कुठेतरी गोष्टींचा जास्त कीस पाडल्यासारखं देखील वाटतं. त्यामुळे स्क्रिनप्ले आणि गोष्टीवर आणखी मेहनत घेण्याची गरज होती. तसेच काही ठिकाणी बालिशपणा केल्यासारखं देखील वाटतं. त्यामुळे हा चित्रपट वन टाइम वॉच आहे. परंतु विद्या बालनच्या अभिनयासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा. या चित्रपटामधील गाणी आणि संगीत आणखी चांगल्या पद्धतीने करता आले असते.