Increase Blood Cells With Food : अनेक डॉक्टर लाल रंगाची तसेच हिरव्या रंगाची फळे खाण्याचा सल्ला देतात. शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन आणि रक्त असणे आवश्यक आहे. शरीरात जर रक्ताचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला लाल रंगाच्या फळांचा डाएटमध्ये समावेश करावा लागेल. या फळांमुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. तसेच डायबिटीज आणि ऑस्टियोपोरोसिस  सारख्या समस्या लाल रंगाची फळ खाल्ली तर कमी होतात. 


1.डाळिंब 
डाळिंब या फळामध्ये अॅंटिऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच कॅन्सर आजार असणाऱ्यांनी देखील डाळिंब खावे. डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढते. तसेच ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस देखील डाळिंब खाल्लानं कमी होते. 


2. सफरचंद
सफरचंद फळामध्ये डायट्री फायबर आणि  फ्लेवेनॉअॅड्स याचे प्रमाण जास्त असते. तसेच सफरचंदाचा डाएटमध्ये समावेश केल्यानं डायबिटीज आणि हार्ट संबंधित आजार देखील बरे होऊ शकतात. जर तुम्हाला शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचं असेल किंवा आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही रोज सफरचंद खाऊ शकता. 
 
3. टरबूज 
टरबूज हे फळ शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. टरबूजमध्ये लायकोपिन असते. जे हार्ट संबंधित आजारांपासून आपल्याला दूर ठेवते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य चांगली राहण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि वजन आटोक्यात राहते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास नियमित डाळिंब खायला हवे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha