Make Money Standing in Line : अनेक वेळा आपण लाइनमध्ये उभे राहिलो किंवा एका ठिकाणी बऱ्याच वेळ उभे राहिलो की वैतागतो. अनेकांना लाइनमध्ये उभे राहायला आवडतं नाही. पण एक व्यक्ती सध्या लाइनमध्ये उभे राहून एका दिवसात 160 पाउंड म्हणजेच जवळपास 16 हजार रूपये कमवत आहे. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जो लाइनमध्ये उभा राहण्यासाठी एका तासाचे 20 पाउंड घेतो. हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊयात या व्यक्तीबाबत...
'द सन' यांनी दिलेल्या माहितीनुसार लाइनमध्ये उभे राहून पैसे कमावणाऱ्या व्यक्तीचं नाव फ्रेडी बेकिट (Freddie Beckitt) असं आहे. फ्रेडी हा 31 वर्षाचा आहे. तो लंडनमध्ये राहत असून तो वेटर आहे. फ्रेडीनं सांगितलं त्यानी ही उभं राहण्याची कला शिकली आहे. त्यानी सांगितलं की जर कोणाला मोठ्या इव्हेंटमध्ये जायचं असेल तर तो त्यांचे तिकीट लाइनमध्ये थांबवून काढतो. कारण लोकांना तिकीट पाहिजे असते पण त्यांच्याकडे लाइनमध्ये थांबायला वेळ नसतो.
फ्रेडीनं सांगितलं की, 'एकदा अपोलो थिएटरमध्ये इव्हेंट होता. त्यावेळी लोकांकडे पैसे होते पण लाइनमध्ये थांबायला वेळ नव्हता अशा वेळी मी लाइनमध्ये थांबून त्यांचे तिकीट काढतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो.' जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचं लोक आहेत त्यांच्यासाठी फ्रेडी V&A's Christian Dior exhibition च्या लाइनमध्ये थांबतो. फ्रेडी केवळ तीन तास लाइनमध्ये थांबून पैसे कमावतो.
फ्रेडी बेकिटनं पुढे सांगितलं की, लंडनमध्ये उन्हाळ्यात अनेक प्रदर्शनांचे आयोजन केलं जातं, त्यावेळी तो खूप बिजी असतो. फ्रेडीनं त्याचं प्रोफाइल Taskrabbit या वेब साइटमध्ये अपडेट केलं आहे. या वेबसाइटमध्ये त्यानं लिहिले आहे की पेट सिटिंग, पॅकिंग हे काम देखील तो करू शकतो.
इतर बातम्या :
The Yamazaki : 'हौसेला मोल नाही'; पठ्ठ्यानं घेतली 4 कोटींची 55 वर्ष जुनी व्हिस्की
Telangana Silk Sarees : माचिसच्या पेटीत मावते 'ही' सिल्क साडी, तेलंगणाच्या विणकराची कामगिरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha