Poor Mental Health Symptoms : निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मनही निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. पण, आजच्या व्यस्त जीवनात (Lifestyle) आपण आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेत नाही. अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: स्त्रिया (Women) ऑफिस आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न असतात की त्यांना स्वत:ची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक स्त्रियांना मानसिक आरोग्याचा (Mental Health) सामना करावा लागतो. पण, स्त्रियांना याची जाणीवच नसते. शरीरात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या मानसिक आरोग्याची काही लक्षणं सांगणार आहोत.


कोणत्याही कामात एकाग्रता नसणे 


अनेकदा महिलांना मानसिक आरोग्यामुळे कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यांचं मन एकाग्र नसते. जेव्हा आपले मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेले असते, तेव्हा कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या कायम राहिल्यास, हे गंभीर मानसिक समस्येचे लक्षण देखील असू शकते.


गोष्टींचा विसर पडणे 


सामान्यपणे, आपल्या सर्वांना कधी कधी गोष्टी ठेवल्यानंतर विसरण्याची समस्या येते. पण जर ही सवय जास्त वेळा होऊ लागली तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण हे काही मानसिक समस्येचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत याला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असे म्हणतात. काही केसेसमध्ये, वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे यांसारख्या समस्या उद्भवतात. पण, काही वेळा हे तणाव, नैराश्य किंवा अल्झायमरसारख्या गंभीर परिस्थितींचे लक्षण देखील असते.


झोप पूर्ण न होणे 


तुमची झोप पूर्ण न होणे हे देखील मानसिक तणावाचे एक लक्षण आहे. याकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. काही वेळा थोडं अस्वस्थ वाटणे किंवा झोप कमी होणे हे सामान्य आहे. पण, जर तुम्हाला दररोज रात्री झोपेचा त्रास होत असेल किंवा डोळे उघडल्यानंतर पुन्हा झोप येत नसेल, तर हे बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे लक्षण आहे.


सतत थकल्यासारखे वाटणे


शारीरिक आणि मानसिकरित्या सक्रिय राहण्यासाठी उत्साही वाटणे खूप महत्वाचे आहे. परंतु पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर ती मानसिक आरोग्याची समस्या असू शकते. 


खाण्याच्या सवयींमध्ये बदल


तुमच्याबरोबर असं होत असल्यास, खूप खाणे किंवा खूप कमी खाणे ही देखील खराब मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात