Health Tips : अनेकदा डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) खाण्याचा सल्ला देतात. आहारतज्ज्ञ अनेकदा भिजवलेले ड्रायफूट्स खाण्याचा सल्ला देतात. याशिवाय, अनेक प्रकारच्या पौष्टिक सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, शेंगदाणे, अक्रोड, बदाम, ज्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, हे आपण एकत्र खाऊ शकतो का? आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्सबद्दल एक गोष्ट वारंवार बोलली जाते ती म्हणजे ड्रायफ्रूट्स हे पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. त्यामुळे हे तिन्ही एकत्र खाल्ल्यास शरीराला खूप फायदा होतो. 


शेंगदाणे, बदाम आणि अक्रोडमध्ये भरपूर प्रथिने असतात. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याच वेळी, त्यात फॅट्स आणि कार्ब्स असतात जे तुम्हाला ऊर्जा देतात. बदामामध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि हेल्दी फॅट्स देखील असतात. याबरोबरच यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे हे तिन्ही एकत्र खाण्यात काही नुकसान नाही पण अनेक फायदे आहेत. 


दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड खाण्याचे फायदे :


स्नायूंसाठी गरजेचं


जर तुम्ही खूप बारीक असाल आणि स्नायूंची कमतरता, तुमची हाडं स्ट्रॉंग नसतील तर शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड तुम्ही एकत्र खाऊ शकता. त्यामुळे तुमचे स्नायू विकसित होतात. जर तुम्ही जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट करत असाल तर हे खूप महत्वाचे आहे. 


पचनसंस्थेसाठी फायदेशीर


दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली आणि मजबूत होते. हे तिन्ही एकत्र करून खाल्ल्याने अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून आराम मिळतो. कारण त्यात भरपूर फायबर असते. जे तुमच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. 


हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर


तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड या तिघांचा आहारात समावेश करावा लागेल. शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड एकत्र खा. हे तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. अक्रोड आणि बदामामध्ये भरपूर पोटॅशियम असते. जे हृदयासाठी चांगले असते. तसेच, अक्रोड हार्ट पेशंटसाठी चांगले मानले जातात.  


हाडांसाठी फायदेशीर 


शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने हाडांना खूप फायदा होतो. कारण ते हाडे मजबूत करण्याचे काम करतात. बदाममध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. बदाम आणि शेंगदाणे आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी