Health Tips : बहुतेक सगळ्याच घरांमध्ये ड्रायफ्रूट्स असतात. त्यातलेच भिजवलेले बदाम सकाळी लहान मुलांना आणि मोठ्यांना खायला दिले जातात जेणेकरून त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्यांना दिवसभर उत्साही वाटते. पण फक्त बदामच नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही रात्री भिजवून सकाळी सेवन केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या पाण्यात भिजवल्यानंतर अधिक फायदेशीर ठरतात आणि त्या खाल्ल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहता. चला तर मग अशा 5 फायदेशीर गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्ही पाण्यात भिजवून खाऊ शकता.


1. अंजीर : जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा अनेकदा पोटदुखीचा त्रास होत असेल तर रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून सकाळी खा. सकाळी अंजीर खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर मात करता येते. 
 
2. मनुका : मनुकाचेही अनेक फायदे आहेत. मनुके रात्री भिजवून खाल्ल्यास त्याचे दुप्पट फायदे मिळतात. तुम्हाला जर अनियमित मासिक पाळी येत असेल किंवा मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही रात्री 8 ते 10 मनुके पाण्यात भिजवून खा. यामुळे तुमची समस्या दूर होईल. 
 
3. मेथीचे दाणे : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर भिजवलेली मेथी तुम्हाला मदत करू शकते. यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी सर्वप्रथम मेथीचे दाणे पाण्यासोबत घ्यावेत. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहील आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहील. 


4. ओवा, जिरे आणि बडीशेप : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण ओवा, जिरे आणि बडीशेप या तीन गोष्टी घरच्या किचनमध्ये असतात. ज्यामुळे तुमचे वेगाने वाढणारे वजन कमी होऊ शकते. याशिवाय जर पचनाचा त्रास होत असेल तर, ओवा, बडीशेप आणि जिरे हे तिन्ही समप्रमाणात मिसळून एक ग्लास पाण्यात भिजवून घ्या आणि तिन्ही गोष्टी कोमट पाण्यासोबत घ्या. सकाळी यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच, याशिवाय पचनाशी संबंधित समस्याही दूर होतील. 
 
5. बदाम : बदामाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. बदाम एक असा ड्राय फ्रूट आहे ज्याचे स्वतःमध्ये अनेक फायदे आहेत. विशेषतः बदाम रात्री भिजवून सकाळी सेवन केल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. बदाम रात्री भिजवून सकाळी त्याची साल काढल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होतेच, शिवाय तुमची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. बदामामध्ये चांगले फॅट असते जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :