Lemon Water Side Effects : लिंबू आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. असे मानले जाते की रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस (Lemon Water) मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय लिंबाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. पण लिंबू पाणी जास्त प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात लिंबू पाणी प्यायल्याने नेमके काय नुकसान होते.


शरीरात पाण्याची कमतरता असू शकते


लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते हे आपणा सर्वांना माहित आहे. पण जेव्हा आपण नियमितपणे आवश्यकतेपेक्षा जास्त लिंबू पाणी पितो तेव्हा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने, एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो, ज्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते.


पचन समस्या


असे मानले जाते की, लिंबू पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. पण, हे पेय काही लोकांना सूट होत नाही. खरंतर, आवश्यकतेपेक्षा जास्त लिंबू पाणी प्यायल्याने मळमळ आणि सूज यांसारखी लक्षणे दिसू शकतात.


छातीत जळजळ होणे


जर तुम्ही जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्याल तर त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते किंवा पुढे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकते. जर तुम्हाला आधीच ऍसिड रिफ्लक्सचा त्रास असेल तर लिंबू पाणी पिणे टाळा.


दातांसाठी हानिकारक


लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांच्या समस्या वाढू शकतात. यामध्ये अम्लीय गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे दातांना नुकसान पोहोचते.


त्वचेची जळजळ होणे


तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्हाला लिंबाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्याने जळजळ होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर लावण्यापूर्वी लिंबाच्या रसामध्ये पाणी मिसळा, नंतर त्वचेवर लावा. यानंतर उन्हात जाणे टाळावे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी