World Cup 2023 Gaurav More Sunandan Lele Video Viral : 'आयसीसी विश्वचषक 2023' (ICC ODI WC 2023) या स्पर्धेतील पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND Vs BAN) पराभव केला. भारतीय संघाने 7 विकेट्सने बांगलादेशचा पराभव केला आहे. भारताने सात विकेट आणि 51 चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान भारताने 41.3 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी चांगलाच जल्लोष केला. अशातच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे (Gaurav More) आणि सुनंदन लेले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते मैदानाबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत.
टीम इंडियाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी चांगलाच जल्लोष केला. पुण्यात झालेल्या सामन्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने हजेरी लावली होती. टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर त्याने मैदानाबाहेर चांगलाच जल्लोष केला. जल्लोष करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे.
गौरव मोरे क्रिकेटचा सामना पाहण्यासह त्याच्या 'बॉईज 4' (Boyz 4) या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी स्टेडियमध्ये गेला होता. भारताने बांगलादेशाला हरवल्यानंतर विनोदवीरासह क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनीदेखील स्टेडियमबाहेर चांगलाच जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुण्यातील विश्वचषकाच्या या सामन्याला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान गौरव मोरे आणि सुनंदन लेले स्टेडियमबाहेर 'गाव सुटना' या गाण्यावर थिरकले. सुनंदन सर आणि गौरव मोरे रॉक्स”, “गौऱ्या लव्ह यू”, “किती भारी मजा केलीत” अशा कमेंट्स त्यांच्या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.
गौरवचा 'बॉईज 4' सिनेमागृहात प्रदर्शित!
गौरव मोरेचा 'बॉईज 4' (Boyz 4) हा बहुचर्चित सिनेमा 20 ऑक्टोबर 2023 (आज) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'बॉईज 4' या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या