Health Tips : भारतीय मसाल्यांमध्ये (Indian Spices) प्रत्येक मसाल्याचा स्वतंत्र असा एक गुणधर्म आहे. त्यातही हिंगाला (Hing) सर्वाधिक महत्त्व आहे. हा मसाला केवळ सुगंधासाठीच नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. यामुळेच भारतीय स्वयंपाकघरात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आयुर्वेद तज्ञ देखील आपल्या आहारात हिंग समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. चला तर मग आयुर्वेद तज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आपल्या आहारात हिंगाचा समावेश का करावा लागतो.
या संदर्भात सांगताना आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा सांगतात की, आरोग्याच्या दृष्टीने हिंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः पोटासाठी हिंग खूप फायदेशीर आहे. हे पाचक एन्झाईम्स वाढवून पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. चला जाणून घेऊयात हिंगाचे फायदे.
पचनाची काळजी घ्या
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा सांगतात की, ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी हिंगाचा वापर नक्की करावा. यामुळे पोट फुगत नाही, जळजळ होत नाही तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे आरोग्य आणि डोळ्यांच्या आजारांमध्ये हे खूप फायदेशीर ठरू शकते. याबरोबरच हे ब्लडप्रेशर, लिव्हर फंक्शन, किडनीशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाब यामध्ये खूप फायदेशीर आहे.
रोज किती हिंग खाऊ शकता?
डॉ. डिंपल जांगरा सांगतात की तुम्ही दररोज तुमच्या आहारात साधारण 250 मिलीग्राम हिंग समाविष्ट करू शकता. तसेच, ज्या लोकांना रक्तस्त्राव किंवा मज्जासंस्थेचे विकार आहेत त्यांनी हिंग खाणे टाळावे.
हिंग कसा खायचा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर चिमूटभर हिंग खाऊ शकता. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी गरम करून त्यात हिंग घालून त्याचं सेवन करू शकता. मात्र, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर हिंग खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच, हिंगाचे इतके फायदे जाणून घेतल्यानंतर, आपण आपल्या आहारात या मसाल्याचा देखील समावेश केला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही हिंगाचा तुमच्या आहारात वापर केला तर तुमच्या अनेक समस्या दूर होतील.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.