एक्स्प्लोर

Health Tips : वारंवार भूक लागण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या प्रत्येक वेळी भूक लागण्याची 6 कारणं

Frequent Hunger : जर तुम्हाला यापेक्षाही जास्त वेळा किंवा पोटभर जेवूनही वारंवार भूक लागत असेल तर मात्र वेळीच सावध व्हायला हवे.

Frequent Hunger : आपण सर्वजण भूक लागल्यावर अन्न खातो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. साधारणपणे एखादी व्यक्ती दिवसातून तीन ते चार वेळा जेवते. पण, जर तुम्हाला यापेक्षाही जास्त वेळा किंवा पोटभर जेवूनही वारंवार भूक लागत असेल तर मात्र वेळीच सावध व्हायला हवे. आरोग्य तज्ञांच्या मते, यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. वारंवार भूक लागण्याची नेमकी कारणं कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

वारंवार भूक लागण्याची 6 कारणे
 
1. प्रथिनांची कमतरता

अन्नामध्ये प्रोटीन कमी असल्यास अनेकदा भूक लागते. कारण प्रथिने ऊर्जा पुरवतात आणि भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवतात. प्रथिने देखील अन्नाची लालसा कमी करण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
 
2. झोपेची कमतरता

झोपेच्या कमतरतेमुळे पुन्हा पुन्हा भूक लागते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर भूकेचे संकेत देणारे घेरलिन हार्मोन अनियंत्रित राहते आणि वाढते. यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागते तसेच झोप घ्यावीशी वाटते.  

3. रिफाईंड कार्ब्सच्या सेवनाने  

रिफाईंड कार्ब्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या अतिसेवनाने भूक वाढते आणि पटकन काहीतरी खावंसं वाटते. रिफाईंड कार्बोहायड्रेट्सच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो.
 
4. शरीरात फायबरची कमतरता

जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे फायबर नसते तेव्हा आपल्याला वारंवार भूक लागते. खरंतर, फायबर समृद्ध असलेल्या गोष्टी भूक कमी करणारे हार्मोन्स तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. अशा स्थितीत अन्नामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असावे.
 
5. खूप ताण वाढल्यामुळे

आजची जीवनशैली धकाधकीची झाली आहे. जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे वारंवार भूक लागते. अशा परिस्थितीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
6. आजारांचा प्रभाव

मधुमेह आणि थायरॉईडसारख्या गंभीर आजारांमुळेही वारंवार भूक लागते. खरंतर, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे ते उर्जेमध्ये रूपांतरित होण्याऐवजी लघवीद्वारे बाहेर येते. अशा परिस्थितीत जेव्हा साखर जास्त असते तेव्हा खूप भूक लागते. काहीतरी खावंसं वाटतं. थायरॉईड संप्रेरक वाढल्यामुळे, व्यक्तीला वारंवार भूक लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget