एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी 'अशी' काळजी घ्या; जळजळ आणि लालसरपणाही होईल दूर

Health Tips : वाढते तापमान, सूर्यप्रकाश आणि धूळ यामुळे डोळ्यांना जास्त संसर्ग, कोरडेपणा आणि तणावाचा सामना करावा लागतो. 

Health Tips : राज्यात काही भागांत हलक्याशा प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र उन्हाच्या (Summer) झळा काही कमी होत नाहीयेत. कडक उन्हामुळे आपल्या त्वचेला तर त्रास होतोच पण त्याचबरोबर डोळ्यांवर देखील सूर्याच्या उष्णतेचा गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत डोळ्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सूर्यापासून येणारे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण उन्हाळ्यात नकळत तुमच्या डोळ्यांना धोका देऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. वाढते तापमान, सूर्यप्रकाश आणि धूळ यामुळे डोळ्यांना जास्त संसर्ग, कोरडेपणा आणि तणावाचा सामना करावा लागतो. 

उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास का होतो?

डोळे हा आपल्या त्वचेचा, शरीराचा एक संवेदनशील भाग आहे. डोळे उष्णता जास्त सहन करू शकत नाही. याच कारणामुळे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा डोळ्यांवर परिणाम होतो. याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांत हवा कोरडी पडते आणि त्याचवेळी हवेत धूळ आणि इतर प्रदूषणाचे कण उडू लागतात, जे डोळ्यांच्या संपर्कात आल्यावर डोळ्यांना त्रास होतो. 

उन्हाळ्यात डोळ्यांची लक्षणे

उष्णतेचा डोळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, त्यामुळे त्याची लक्षणेही अनेक प्रकारची असतात.

1. डोळ्यांतून वारंवार पाणी येणे.

2. बाहेरून आल्यावर डोळे लाल होणे.

3. सूर्यप्रकाशात नीट न दिसणे.

4. सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखीचा त्रास होणे.

5. धूळ आणि घाणीमुळे डोळ्यांत जळजळ होणे आणि खाज सुटणे.

6. डोळे कोरडे होणे.

उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?

उन्हाळ्यात ज्या प्रकारे आपण आपल्या त्वचेची आणि केसांची उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या सुरक्षेसाठीही काही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. कारण उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हे टाळण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. 

1. वेळोवेळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

2. बाहेर जाताना गॉगल वापरा.

3. धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.

4. दुपारी शक्यतो घरीच राहा.

5. चेहऱ्यावर चष्मा लावून घाम येऊ देऊ नका. 

6. डोळ्यांना वारंवार हात लावू नका.

7. वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

तेजस्वी प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करा

उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम डोळ्यांना तेजस्वी प्रकाशापासून वाचवा. यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी सनग्लासेस लावा. जर तुम्हाला सनग्लासेस लावणे आवडत नसेल तर तुम्ही छत्री, स्कार्फ, टोपी यांसारख्या गोष्टी वापरून डोळ्यांचं रक्षण करू शकता. 

शरीर हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी शरीराला हायड्रेट ठेवा. यासाठी दिवसातून किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर फळे खा, यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. 

 

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
Health: नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
World Heart Day 2026 : तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या
तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget