Skin Care Tips : हिवाळा ऋतू (Winter Season) तसा अनेकांना आवडतो. पण, या ऋतूमुळे जी आपली त्वचा कोरडी (Dry Skin) होते तिचा मात्र प्रचंड त्रास होतो. अनेकदा बाहेर कार्यक्रमाला, लग्नसमारंभाला जाताना कोणाचे आपल्या कोरड्या त्वचेकडे लक्ष तर जाणार नाही ना याची काळजी आपल्याला असते. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी होणे हे जरी सामान्य लक्षण असले तरी याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. म्हणूनच, थंडीत कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा कोरडी राहणार नाही आणि ग्लोसुद्धा करेल. 


हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळेल


हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेवर खाज आणि जळजळ सुरु होते. यासाठी अनेकजण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. अनेक क्रिम लावतात. पण, यामुले तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. काहींना पिंपल्सचा त्रास होतो, तर काहींना त्वचेवर जळजळ होण्यास सुरुवात होते. म्हणूनच हिवाळ्यात पपई तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देते. मात्र, पपईचा नेमका कसा वापर करावा हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पपईमधील फ्लेव्होनॉइड्स कोलेजन तयार करण्यात मदत करतात, ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि पिंपल्स मुक्त राहते. याबरोबरच पपईमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात.


'अशा' प्रकारे पपईचा वापर करा 


कोरड्या त्वचेवर पपईचा फेस मास्क तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतो. घरी फेस मास्क बनवण्यासाठी एक चतुर्थांश कप चिरलेली पपई घ्या आणि तिचे बारीक काप करा, त्यानंतर अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये घाला. अशा प्रकारे पपईचा नैसर्गिक फेस मास्क घरी तयार करा. हा मास्क चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्ती देतो आणि त्वचेला पोषण देतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. तुम्ही हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा वापरू शकता. मात्र, ज्या लोकांना पिंपल्सचा त्रास आहे, ज्यांची त्वचा अतिशय सेन्सिटीव्ह आहे. त्यांनी मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्याने या फेस मास्कचा वापर करावा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल