Health Tips : गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये होणारा धोकादायक कर्करोग आहे. हा रोग शरीरात विकसित होतो जेव्हा अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूबच्या आसपास असामान्य पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते, जी धोकादायक झाल्यास शरीराच्या इतर भागात पसरते.


इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, ओव्हेरियन कॅन्सर ऍक्शननुसार, दरवर्षी 2,95,000 महिलांवर गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार केले जातात. महिलांमध्ये होणारा हा सहावा कर्करोग आहे. 90 टक्के लोकांना त्याची चार लक्षणे माहित नाहीत, जी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.


1. सतत ओटीपोटात दुखणे


2. सतत जळजळ


3. खाण्यास त्रास होणे किंवा भूक न लागणे


4. जास्त लघवी होणे 


नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित इतर लक्षणे आहेत, जसे की 


1. वारंवार अपचन होणं 


2. बद्धकोष्ठता आणि अतिसार


3. पाठदुखी


4. थकवा जाणवणे


5. अचानक वजन कमी होणे


6. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे


तसेच, बऱ्याच वेळा ही लक्षणे सामान्य आरोग्य समस्यांमध्ये देखील दिसू शकतात. मात्र, ही लक्षणे अधिक जाणवल्यास गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. काहीवेळा लहानशा शारीरिक समस्या रोगाच्या सुरुवातीचा संदेश देतात, त्यामुळे या छोट्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.


गर्भाशयाचा रोग कसा ओळखला जाईल?


या रोगाचं निदान करण्यासाठी, प्रथम स्त्रीची रक्त तपासणी केली जाते. त्यानंतर अल्ट्रासाऊंड स्कॅनला प्राधान्य दिले जाते. तसेच, सीटी स्कॅन, सुई बायोप्सी (तुमच्या अंडाशयातून पेशी किंवा द्रवपदार्थाचा एक छोटासा नमुना काढून टाकणे), लॅपरोस्कोपी (तुमच्या अंडाशयाची तपासणी ट्यूबच्या आत कॅमेऱ्याने करणे) आणि लॅपरोटॉमी (ऊती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया) याद्वारे हा आजार ओळखता येतो. 


उपचार कसे केले जातात?


तुमच्यावर उपचार कसे केले जातील हे ट्यूमरचा आकार, तो कुठे आहे, तो पसरला आहे की नाही आणि तुमचे आरोग्य सामान्य आहे की नाही यावर अवलंबून आहे. रोगाच्या स्थितीनुसार, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, थेरपी किंवा हार्मोन थेरपी आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल