Obesity : आपण जितका जास्त ताण (Stress) घेतो तितकी जास्त आपली लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत जाते हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. खरंतर, स्ट्रोक आणि लठ्ठपणा हे जीवनशैलीचे (Lifestyle) असे विकार आहेत जे एकमेकांशी संलग्न आहेत. सध्याच्या काळात आपली व्यस्त जीवनशैली आणि तणावाचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. तणावामुळे अनेकांना लठ्ठपणाचाही सामना करावा लागतो. हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. अशा परिस्थितीत, तणाव आणि लठ्ठपणाचा नेमका संबंध काय? तसेच, यामुळे शरीराला कोणतं नुकसान होऊ शकतं या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


तणावामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो


नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं म्हटलंय की, ताण आणि लठ्ठपणा हे विकार एकमेकांशी संलग्न आहेत. तणाव आत्म-नियमन सारख्या संज्ञानात्मक प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. यामुळे कॅलरी, फॅट आणि शुगर यांसारख्या पदार्थांची लालसा वाढते. ज्यामुळे शरीर सामान्यपणे कार्य करू शकत नाही. तणावाच्या काळात, लेप्टिनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. यामुळे भूकदेखील वाढते. यासाठीच तणावात अनेकांना जास्त भूक लागते. या अति खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने शारीरिक हालचालीही कमी होतात आणि शरीरात फॅट तयार होतं. यामुळे झोपही कमी होते, हेदेखील लठ्ठपणा वाढण्याचं एक कारण आहे.


तणावामुळे 'या' सवयी वाढतात


1. तणावाच्या काळात शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे अनहेल्दी पदार्थ खाण्याची लालसा वाढते. अशा परिस्थितीत, तुमचं वजन वाढू शकतं.
 
2. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपण असंतुलित आणि अनहेल्दी गोष्टी खाण्यास सुरुवात करतो. त्यामुळे भूक अचानक वाढते आणि आपण जास्त खातो.
 
3. तणावाखाली राहिल्याने झोपेवर परिणाम होतो. योग्य झोप न मिळाल्याने शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होण्याची भीती असते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.


तणाव आणि लठ्ठपणा टाळायचा असेल तर काय करावं?


1. दीर्घकालीन तणावासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
2. तणाव टाळण्यासाठी योग आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करा. व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा.
3. तणावात जास्त खाणं टाळा. तुमच्या आजूबाजूला आरोग्यदायी गोष्टी ठेवा. जेणेकरून गरज भासल्यास जंक फूडऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स यांसारख्या गोष्टी खाऊ शकता.
4. तणावात जास्त खाणं टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोपदेखील घेऊ शकता. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्ही हवामान बदलत असताना रोज दही खाण्यास सुरुवात केलीय? आधी तोटे जाणून घ्या