Health Tips : उन्हाळा (Summer) जसजसा सुरु होतो तसतसे लोक आपल्या आहारात (Food) दह्याचा समावेश करू लागतात. दह्याची (Yogurt) चव आणि थंडपणामुळे लोकांना ते खूप आवडतं. तसेच, उन्हाळ्यात दही खाल्ल्याने थकवा, अशक्तपणा आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच, उन्हाळ्यात ज्या पदार्थांचा प्रभाव थंड असतो अशा गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. पण, काही लोक उष्णता येताच जास्त दही खाण्यास सुरुवात करतात, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शरीराला थंड ठेवणारं दही तुमचं कशा प्रकारे नुकसान करू शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दह्याचे पोषक तत्त्व
दह्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि ए यांचा समावेश होतो. इतके पोषक तत्व असूनही काही लोकांसाठी दही हानिकारक ठरू शकते. यामुळे शरीरात वेदना, जळजळ आणि सूज येऊ शकते.
दही कोणी खाऊ नये?
दह्यामध्ये युरिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. या कारणास्तव, ज्या रुग्णांना आधीच यूरिक ऍसिडचा त्रास आहे त्यांनी दही खाणे टाळावे.
याशिवाय 'या' आजाराच्या रूग्णांनीदेखील दह्याचं सेवन टाळावं
दम्याचे रुग्ण
दह्याचा इफेक्ट हा फार कूलिंग असतो. त्यामुळे जे अस्थमाचे रूग्ण आहेत अशा लोकांनी दह्याचं सेवन करू नये.
बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या
दह्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात त्यामुळे गुडघेदुखी आणि सूज येण्याची समस्या वाढते. याशिवाय दही पचायलाही वेळ लागतो त्यामुळे काही लोकांना अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. ज्यांना आधीच बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी दही खाणे टाळावे.
पोटासंबंधित आजार
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. पण, काही लोकांसाठी ही पोटदुखीची समस्या होऊ शकते. दररोज जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने गॅस आणि अपचन सारख्या समस्या देखील होऊ शकतात. यामुळे ज्यांना पोटाच्या संबंधित आजार आहेत अशा लोकांनी दही खाणं टाळावं.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :