Smoking and Lung Cancer : धूम्रपान (Smoking) हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं (Lung Cancer) सर्वात मोठं कारण मानले जाते. नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC) हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत. NSCLC कमी वेळा उद्भवते आणि सामान्यतः वेगाने वाढते, तर SCLC अधिक सामान्य आहे आणि अधिक हळूहळू वाढते. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या कौटुंबिक इतिहासाबद्दल सांगण्यात आले आहे. जे या रोगाच्या विशिष्ट प्रकारच्या विकासाच्या वाढीबद्दल सांगते. सिगारेट ओढणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. पण, आनुवंशिकता (Genetic) आणि कौटुंबिक इतिहास हे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगामागचं मुख्य कारण असू शकते. 


अभ्यासात काय म्हटलंय? 


तैवानमध्ये झालेल्या या अभ्यासात 12,011 सहभागींनी भाग घेतला. कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्याचे संकेत होते. विशेषत: तैवानमध्ये जेथे धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग अधिक सामान्य आहे. येथे सुमारे 60% प्रकरणांचे निदान चौथ्या टप्प्यात होते.
 
या लोकांना अनुवांशिक कारणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.


1. जर तुमच्या पालकांना किंवा भावंडांना फुफ्फुसाचा कर्करोग असेल तर तुमचा धोका देखील वाढू शकतो.
2. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. 
3. पुरुषांपेक्षा स्त्रियांना कर्करोगाचा धोका जास्त असतो.
4. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. 


भारतात फुफ्फुसाचा कर्करोग 


ICMR ने 2022 मध्ये केलेल्या अभ्यासात असं म्हटलंय की, देशात फुफ्फुसाच्या कर्करोगाची 70,275 प्रकरणे असल्याचे नोंदविण्यात आलं आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा देशातील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. या आजारात मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.  ज्यामध्ये उच्च मृत्यू दर आहे, सर्व कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी 9.3% मृत्यू आहेत. सध्या त्याची संख्या वाढली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत भारतात पुरुषांसाठी ८१,२१९ आणि मुलींच्या ३०,१०९ प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गर्भधारणेनंतर महिलांच्या स्तनात आढळणारा 'रस्टी पाईप सिंड्रोम' नेमका आहे काय? वाचा लक्षणं आणि उपचार