Airport : मानवी जगाचा इतिहास पाहिला तर अवकाशाची उंचीही मोजली आणि समुद्राची खोलीही शोधली. याच्या कुतूहलाने जगातील अनेक रहस्ये उलगडली आहे. जपानमध्ये (Japan) समुद्राच्या (SEA)मधोमध विमानतळ बांधण्याचा पराक्रम केला आहे. हे विमानतळ (Airport) तयार करण्यासाठी 7 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. या विमानतळासाठी 20 अब्ज डॉलर्स खर्च झाला होता. आता मात्र, जवळपास 30 वर्षांनंतर समुद्र हळूहळू हे विमानतळ काढून घेत आहे. दरवर्षी हे विमानतळ बुडत आहे.


हे विमानतळ आतापर्यंत सुमारे 40 फूट बुडाले


आपण जपानच्या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत. हे विमानतळ 1994 पासून वाहतुकीसाठी सुरू केले होते. हे ओसाका आणि जपानच्या इतर जवळच्या शहरांमध्ये उपयुक्त आहे. आता हे विमानतळ सातत्याने बुडत आहे. 2018 च्या अभ्यासानुसार हे विमानतळ आतापर्यंत सुमारे 40 फूट बुडाले आहे. 2056 पर्यंत हे विमानतळ आणखी 13 फूट बुडण्याची शक्यता आहे. त्यानंतर समुद्राचे पाणी येथे पृष्ठभागावर येईल.


हे विमानतळ महत्त्वाचे का?


या विमानतळाचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली. आजही ते दरवर्षी 2.5 कोटी प्रवाशांना सेवा देते. ते तयार करण्यासाठी 1.66 लाख कोटी रुपये खर्च आला होता. त्याची धावपट्टी 4,000 मीटरपेक्षा जास्त लांब आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे विमानतळ बनले आहे. मुख्य शहरापासून दूर असलेल्या या विमानतळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते 24 तास सुरु ठेवता येते. हे जपानमधील ओसाका, क्योटो आणि कोबे सारख्या मोठ्या शहरांना जगाशी जोडते. हे ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एअरलाइन्ससाठी बेस स्टेशन म्हणून देखील काम करते.


समुद्राच्या मध्यभागी विमानतळ का बांधले?


जेव्हा ओसाकाच्या जुन्या विमानतळावर प्रचंड गर्दी होऊ लागली, त्यावेळी हे विमानतळ बांधण्याची कल्पना समोर आली. हे विमानतळ बांधण्यासाठी समुद्रात सी बेड तयार करण्यात आला होता. एवढेच नाही तर या विमानतळाला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याभोवती समुद्र संरक्षण भिंत बांधण्यात आली. आता विमानतळाचे वजन आणि त्यावर बांधण्यात आलेल्या टर्मिनल इमारतीमुळे हा सागरी तळ बुडत असल्याने विमानतळ बुडत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून महत्वाच्या शहरात विमानसेवा सुरु करणार, फ्लाय 91 कंपनीचा निर्णय