Lemon Water Benefits : उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक लिंबू पाण्याची आठवण येतेच. लिंबू पाण्याने झटपट ऊर्जा तर मिळतेच. पण त्याचबरोबर शरीरालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही एक ग्लास लिंबूपाणी जरी प्यायलात तरी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते. या लिंबूपाण्याचे वजन कमी करण्याबरोबरच इतरही अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घ्या.
लिंबूपाण्याचे फायदे :
वृद्धत्वविरोधी : लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ते तुमच्या त्वचेच्या दुरुस्तीचा वेग वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहरा उजळतो.
निरोगी केस : लिंबूमध्ये हायड्रेशन तसेच तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे ते केसांना आतून पोषण देते आणि त्यांची मुळे मजबूत करण्याचे काम करते.
मुरुमांपासून मुक्त त्वचा : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही मुरूमांनी त्रस्त असाल तर तुम्ही दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.
पचन सुधारते : दररोज लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅस, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर राहतात. अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत असला तरीही, तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन करू शकता.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन-सी आणि सायट्रिक ऍसिडमुळे, लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि ते तोंडाचे आरोग्य देखील सुधारते. उदाहरणार्थ, हिरड्यांमधून रक्त येण्यापासून ते घसा खवखवण्याची समस्या लिंबाच्या सेवनाने बरी होते. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू मिसळून गार्गल करा. या दोन्ही समस्या काही मिनिटांत दूर होतील.
लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ
- लिंबूपाणी कोणत्या वेळी प्यावे हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर एक तास लिंबूपाणी घेऊ शकता.
- वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यायचे असेल तर सकाळी त्याचा वापर करा. एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. पाणी कोमट ठेवणे चांगले.
- पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही जेवणानंतर लगेच अर्धा ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता. लक्षात ठेवा की पाणी कोमट असावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :