Weight Loss Tips :  सध्या लठ्ठपणाची समस्या अनेकांना जाणवत आहे. याचे कारण काहीही असू शकते. जीवनशैली,  आजार, झोप न होणे, जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करणे अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे लोकांचे वजन वाढते. जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर ही कामे करु शकता-


वर्क-आऊट करा


रोज सकाळी उठल्यानंतर एक तास व्यायाम करा. व्यायाम केल्यानं तुमची पचन क्रिया चांगली होईल. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल तसेच तुम्ही निरोगी देखील राहाल. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तक  फक्त कार्डियो वर्क-आऊटवर अवलंबून राहणे योग्य नाही.  स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज आणि कार्डिओ वर्क-आऊट हे दोन्ही करावेत.  


वॉक करा


जर व्यायाम कराण्यासाठी सकाळी तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 20 ते 30 मिनीट वॉक करु शकता. वेगानं वॉक केल्यानं तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. तसेच तुमच्या शरीरामधील फॅट्स देखील कमी होतील. 


सकाळी मेथीचे दाणे, ओव्याचं पाणी प्यायल्यानं झटपट कमी होईल वजन
मेथीचे दाणे आणि ओव्यामध्ये  अँटीऑक्सीडेंट असतात. जे शरीरातील मेटाबॉलिज्म मजबूत करतात. ओवा आणि मेथीचे दाणे मिक्स केलेले पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज एक ग्लास ओवा आणि मेथीचे दाणे टाकलेले पाणी पिले पाहिजे. जर तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढते किंवा कमी होत असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी  मेथी आणि ओवा मिक्स केलेले पाणी प्यावे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :