मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने कधीच प्रचाराचा नारळ फोडून टाकला आहे. दोन्हीकडून एकमेकांवर शाब्दिक वार सुरु आहेत. येत्या निवडणुकीत शिवसेनेचा की भाजपचा भगवा फडकणार ? याबाबत चर्चेला ऊत आला असतानाच सट्टा बाजारात भाजपची चलती असल्याचे दिसून येते. बीएमसी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात येत आहे. याबाबत 'द हिंदू बिझीनेस लाईन'ने वृत्त दिले आहे. बीएमसीवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे. मुंबई मनपाचे बजेट तब्बल 50हजार कोटींचे असून आणि जवळपास 80 हजार कोटींच्या ठेवी आहेत.
गुजरातमध्येही भाजपला बहुमत
मुंबई मनपा निवडणुकीबरोबर बुकींनी गुजरात निवडणुकीसाठी सुद्धा सट्टा बाजार सुरु केला आहे. गुजरातच्या निवडणुकीला अजूनही सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्या ठिकाणी सुद्धा भाजपला बहुमताने विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सट्टा बाजारातील सूत्रांनी माहिती दिली आहे.
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल भाजपकडून निवडणूक लढवतील असे भाकित बुकींकडून वर्तवण्यात आले आहे. पटेल यांनी अलीकडेच काँग्रेसला रामराम केला आहे. पुढील काही महिन्यात ते भाजपमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पटेल 20 ते 25 जागांवर प्रभाव पाडू शकतात ज्या ठिकाणी पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा किती रॅली करतील यावर रेटमध्ये वर खाली होऊ शकतो असे बुकींना वाटते.
मुंबई निवडणुकीचे सट्टाबाजारातील गणित
बीएमसीच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये 236 जागांसाठी लढतील. भाजपला जवळपास 120 जागांवर विजय मिळवण्याची खात्री आहे. सध्याचे ट्रेंड पाहता हा आकडा 130 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुकी1 रुपया देण्याच्या तयारीत आहेत. BMC निवडणुकीत भाजपने 120 जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रुपयाच्या वर 1 रुपया द्यायला तयार आहेत. 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रुपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे.
जागांच्या संख्येवरील कमी पेआउट गुणोत्तर असे सूचित करते की बुकींना राजकीय पक्षाला अनेक जागा जिंकण्याचा विश्वास आहे.
शिवसेनेला फक्त 10ते 30 जागांचा अंदाज
शिवसेना बीएमसी निवडणुकीत फक्त 10 ते 30 जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रुपयाला 10 पैशांपासून ते 62 पैशांपर्यंत दर देण्यात आला आहे. तथापि, शिवसेना ४० जागा जिंकल्यास बुकी रुपयावर अडीच रुपये देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना 40 जागा जिंकेल अशी शक्यता बुकींनी वाटत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला सर्वाधिक तडाखथा बसला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल यात शंका नाही.
राज ठाकरेंच्या मनसेला 5 ते 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी रुपयावर बुकींची 22 पैशांपासून 85 पैशांपर्यंत रेट देण्याची तयारी आहे. शिवसेनेच्या प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा मनसेला होईल, असेल बोलले जात आहे. शिवसेनेकडील काही मते भाजपकडे जातील अशी शक्यता होती, पण आता ती मनसेकडे जातील असेही बुकी म्हणतात. बुकींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोणताही रेट दिलेला नाही.
हे ही वाचलं का ?