Jaundice Health Tips : कावीळ (Jaundice) आजार हा यकृताच्या सामान्य विकारांपैकी एक आहे. रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा पिवळी पडते. हे या रोगाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. कावीळ बहुतेक नवजात बालकं, लहान मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या प्रौढांमध्ये दिसून येते. कावीळ ग्रस्त लोकांना अनेकदा अन्न आणि द्रव पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थ आणि ज्यूसबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन कावीळच्या रुग्णांनी करणं गरजेचं आहे. 


कावीळ रुग्णांसाठी 'हे' ज्यूस फायदेशीर


1. मुळ्याचा रस : मुळ्याचा रस आपल्या प्रणालीतील अतिरिक्त बिलीरुबिन बाहेर काढण्यास मदत करतो. हा रस तयार करण्यासाठी एक मोठा मुळा किसून त्याचा रस काढा किंवा ताज्या मुळ्याची पाने पाण्यात उकळा. नंतर स्वच्छ मलमलच्या कापडाने गाळून घ्या. दररोज 2 ते 3 ग्लास या मुळ्याच्या रसाचे सेवन करा. 


2. गाजराचा रस : कोणत्याही आजारात फळे आणि भाज्यांचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. ज्या रूग्णांना कावीळची लागण झाली आहे त्यांनी गाजर आणि बीटचा रस नक्की प्यावा.


3. ऊसाचा रस : कावीळपासून लवकर बरे होण्यासाठी ऊसाचा रस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. दिवसातून दोनदा याचे सेवन केल्याने यकृत मजबूत होण्यास आणि त्याची क्रिया पूर्ववत होण्यास मदत होते.


4. टोमॅटोचा रस : टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्यात लाइकोपीन नावाचे तत्व आढळते, जे यकृत निरोगी ठेवते, अशा परिस्थितीत, कावीळच्या रुग्णांसाठी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.


5. लिंबाचा रस : लिंबूमध्ये डिटॉक्सिफायिंग क्षमता असते. कावीळपासून मुक्त होण्यास लिंबाचा रस आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे, 


कावीळ झाल्यास काय खाऊ शकतो?


1. संपूर्ण धान्य


2. ताजी फळे आणि भाज्या


3. शेंगदाणे आणि शेंगा


4. कॉफी आणि हर्बल टी


5. प्रथिने


6. भरपूर पाणी प्या


जर तुम्ही वरील पदार्थांचं सेवन केल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रिटमेंट घेतल्यास तुम्ही लवकर या आजारातून बरे होऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल