Health Tips :  छातीत जळजळ होणे किंवा पोटात आम्लपित्त होणे हे आजचे सर्वात सामान्य आजार आहेत. हे आजार टाळण्यासाठी बहुतेक लोक Allopathic medicine वापरतात. ज्यामुळे काही काळ आराम मिळतो, परंतु पुढील काही तासांनंतर या औषधांची पुन्हा गरज भासते कारण जळजळ आणि ऍसिडिटीचा त्रास पुन्हा उद्भवतो. ही समस्या टाळण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आवळा पावडर. याचं सेवन नेमकं कसं करावं याची सोपी पद्धत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


परिणाम लवकरच दिसून येईल


छातीत जळजळ होणे किंवा पोटात उष्णतेची समस्या जाणवणे या दोन्ही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवळा पावडर खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची जळजळ लगेच शांत होते आणि तुम्हाला काही सेकंदातच आराम मिळतो. आवळा हे असे फळ आहे, जे वर्षातील प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक ऋतूमध्ये वापरता येते. याचा शरीराला नेहमीच फायदा होतो. आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते.


कसे वापराल ?


आवळा पावडरचे सेवन करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सर्वप्रथम, सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि हळू हळू प्या. हे पाणी एका दमात न घेता हळू हळू चहासारखे प्या. असे केल्याने तुम्हाला तुमच्या छातीची जळजळ कमी होतेय असं जाणवेल आणि पोटातील उष्णतादेखील शांत होईल. 


अशा पद्धतीने आवळा पावडरचे सेवन दररोज करावे. तुमच्या छातीची जळजळ नक्की कमी होईल. तसेच, सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात जसे की,



  • शरीर निरोगी होते.

  • पचनक्रिया चांगली राहते.

  • पोटात गॅस होत नाही.

  • दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.


लक्षात ठेवा की दर 15 किंवा 21 दिवसांनी, ही पद्धत काही दिवस थांबवा आणि नंतर पुन्हा तुम्ही याचे सेवन करू शकता. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर तुम्ही ते पुन्हा सेवन सुरू करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha