Health Tips : आजकाल मधुमेहाचं प्रमाण फार वाढत चाललं आहे. सामान्यत: मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फक्त गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. तर, यासाठी तुमच्या सवयी देखील कारणीभूत आहेत. त्यामुळे तुमच्या सवयींवर लक्ष ठेवणं तसेच त्या नियंत्रित ठेवणं गरजेचे आहे. या अशा कोणत्या सवयी आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टींवर नियंत्रण ठेवा
दररोज व्यायाम करा
मधुमेहापासून दूर राहण्यासाठी, दररोज किमान 30-40 मिनिटं शारीरिक हालचाली करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारखे व्यायाम केल्याने शरीरातून घाम गाळा. योग करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. अशी अनेक आसने आहेत, जी हार्मोन्स संतुलित ठेवतात, पचनसंस्था निरोगी ठेवतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. आसनांव्यतिरिक्त, ध्यानावर देखील लक्ष केंद्रित करा. यामुळे तणाव दूर होतो.
खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा
जर तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल. यासाठी निरोगी आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजून घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा कमी प्रमाणात खा. विशेषत: आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषण असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तळलेले, जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा.
मीठ आणि साखरेवर नियंत्रण ठेवा
जेवणात मीठ घालण्याची सवय सोडून द्या. त्याचप्रमाणे मिठाईचे सेवन कमीत कमी प्रमाणात करा. रात्रीच्या वेळी आहारात मीठ आणि साखरेचा वापर पूर्णपणे टाळा. त्याऐवजी गुळाचे सेवन करा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रपान आणि मद्यपानाच्या सेवनामुळे रक्तदाब, लठ्ठपणा, साखर अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासूनही दूर राहा.
वजन नियंत्रणात ठेवा
प्री-डायबेटिस असलेल्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यास तो मधुमेहापासून बऱ्याच अंशी दूर राहू शकतो. हाच नियम मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना लागू होतो. बॉडी मास इंडेक्स (BMI) 18 ते 23 च्या दरम्यान ठेवा. तुमच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :