Millets In Diet : थंडीच्या दिवसांत बाजरी, ज्वारी, जव, नाचणी यांसारख्या मिलेट्सचा (Millets) आपल्या आहारात समावेश करणं फार फायदेशीर मानलं जातं. कारण यामध्ये अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असतो. ही पोषक तत्त्व आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी फार मदत करतात. कडाक्याच्या थंडीत या मिलेट्सचा आहारात समावेश केल्याने आपली पचनक्रिया चांगली राहते. बाजरीचा आपल्या आहारात (Food) समावेश केल्याने आपली प्रतिकारकशक्ती तर चांगली राहतेच पण त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यंपासून देखील आराम मिळतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे हिवाळ्यात मिलेट्सचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
मिलेट्स कशी खावीत ?
बाजरी, ज्वारी, जव, नाचणी, मका इत्यादींचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास खूप फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिलेट्सपासून तयार होणारे विविध पदार्थ बनवायलाही फार सोपे आणि चवदार असतात. यापासून तुम्ही चपाती, पराठे, इडल्या, खीर, हलवा यांसारखे अनेक पदार्थ बनवू शकता. हिवाळ्यात त्यांचे सेवन अधिक फायदेशीर ठरते. या बाजरीच्या चपात्या तुम्ही दही, तूप किंवा चटणीबरोबर नाश्त्यात घेऊ शकता. यापासून बनविलेली खिचडी आणि पुलावसुद्धा चवीला फार उत्तम लागतो. दुपारच्या जेवणात तुम्ही अगदी सहज खाऊ शकता.
हृदयविकारांसाठी फायदेशीर
बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळतात. तसेच फायबर कमी कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखतात. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात बाजरीची भूमिका महत्त्वाची असते. उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. म्हणून, बाजरीच्या सेवनाने हृदयाशी संबंधित रोगांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
पोटासाठी फायदेशीर
बाजरीमध्ये असलेले फायबर प्रीबायोटिक म्हणून काम करते. हे आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. हे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास आणि पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करतात. याशिवाय बाजरीत फायबरचे प्रमाणही जास्त असते. फायबर आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादीपासून आराम मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.