Hair Care Tips : केस गळणे, टक्कल पडणे किंवा कमकुवत केस (Hair Care Tips) येण्यामागील कारणं तणाव, आनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन किंवा औषधांचं सेवन असू शकतं. पण तुम्हाला माहित आहे का की रोज ड्रिंक प्यायल्याने तुम्हाला टक्कल पडण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे. हे पेय पिण्याच्या सवयीमुळे पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय.


चवीच्या नावाखाली तुम्ही तुमच्याच केसांचे शत्रू कसे बनत आहात ते आम्ही तुम्हाला सांगतो. कमकुवत केस मजबूत कसे बनवायचे हे देखील जाणून घ्या.


एनर्जी ड्रिंक घेऊ नका 


बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठात केसगळतीवर एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये संशोधकांनी सांगितले की, जर तुम्हाला एनर्जी ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेयं पिण्याचे व्यसन असेल तर तुम्हाला केसगळतीला सामोरे जावे लागू शकते. त्याचा परिणाम पुरुषांमध्ये अधिक दिसून येतो. अभ्यासानुसार, 13 ते 29 वयोगटातील लोकांना याचा जास्त फटका बसतोय.


अभ्यासात काय म्हटलंय?


या अभ्यासात 1000 पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांना आठवड्यातून 3 लिटर एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. संशोधनानंतर असे आढळून आले की, ज्या व्यक्तीने दिवसातून एकापेक्षा जास्त पेय घेतले त्यांना केस गळण्याचा धोका 42 टक्के जास्त असतो.


फास्ट फूडमुळेही नुकसान होते


ज्या लोकांना फास्ट फूडची सवय आहे किंवा जे लोक कमी भाज्या खातात त्यांना केस गळण्याचा धोका तर असतोच पण त्यांना अनेकदा टेन्शनही असते असे या अभ्यासातून समोर आले आहे. फास्ट किंवा जंक फूडमुळे लठ्ठ होण्याचा धोका असतो. 


केस स्ट्रॉंग कसे कराल?


जर तुमचे केस कमकुवत असतील तर तुम्ही तुमच्या केसांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय, घरगुती उपाय देखील करून पाहा. केस गळणे किंवा कमकुवत केस मजबूत करण्यासाठी कोरफड जेल वापरा. कोंडा हे केस गळण्याचे मुख्य कारण आहे आणि ते तुम्ही लिंबू आणि दह्याने दूर करू शकता. ऋतू कोणताही असो, दुपारी आंघोळीपूर्वी लिंबू-दह्याची पेस्ट टाळूवर लावा. केस सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी अंड्याच्या केसांचा मास्क लावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर भेंडीच्या पाण्याने केस चमकदार बनवू शकता.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल