Health Tips : आजकालच्या व्यस्त जीवनात सगळेच बिझी झाले आहेत. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. अशावेळी लोकांना अनेकदा अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितीत शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी ऊर्जेची सर्वाधिक गरज असते. तसेच, कधीकधी झोपेची कमतरता देखील थकवा आणू शकते. शरीरात उर्जेची कमतरता असेल तर व्यक्तीला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, जे खाल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात, शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
अंडी
प्रथिनेयुक्त अंडी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यात अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. तुम्ही ते रोज नाश्ता म्हणून खाऊ शकता. अंड्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी12, सेलेनियम आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरातील ऊर्जा पातळी राखतात.
पॉपकॉर्न
पॉपकॉर्न संपूर्ण धान्यापासून तयार केले जाते. यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. इतर कुरकुरीत स्नॅक्सच्या तुलनेत त्यात कमी कॅलरी असतात. हे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते.
सफरचंद
सफरचंद फायबरचा समृद्ध स्रोत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रोज सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार शरीरापासून दूर राहतात. याशिवाय अँटिऑक्सिडंट्स, फायबर, क्वेर्सेटिन, कॅटेचिन, फ्लोरिडझिन आणि क्लोरोजेनिक अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक सफरचंदात आढळतात. शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत होते.
सोयाबीन
सोयाबीनमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरात ऊर्जा पातळी प्रसारित करतात. शाकाहारी लोकांसाठी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करू शकता.
काजू
पोषक तत्वांनी युक्त ड्रायफ्रूट्स अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करतात. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् त्यात आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत. हे खाल्ल्याने ऊर्जा मिळते.
केळी
केळीला इन्स्टंट एनर्जी फूड म्हणूनही ओळखले जाते. फायबर युक्त केळी खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागते आणि शरीरातील स्टॅमिना वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :