नाशिक : 'मतदारसंघाच्या कामासाठी ठीक आहे, पण थेट व्यासपीठावरच जाऊन बसणे, योग्य नसून 'इतर पक्षांच्या बैठकीत जाताच कशाला, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित करत आमदार हिरामण खोसकर यांची कानउघाडणी केली. तसेच हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) फार आनंदी आहे, त्यांना काँग्रेस हाच पर्याय आहे, मात्र काही लोक आपल्याला पालकमंत्री होता, यावे म्हणून आपली गिणती लावत असल्याचा प्रत्यक्ष टोला छगन भुजबळांना लगावला आहे. 


काँग्रेसचे (Congress) आमदार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) व्यासपीठावरील उपस्थितीमुळे त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार खोसकर अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या नाना पटोले यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. 'इतर पक्षांच्या बैठकीत जाताच कशाला, असा सवाल करीत तुमचे वर्तन पक्षविरोधी असल्याचा इशाराही पटोले यांनी खोसकर यांना दिला. तसेच जिल्हाभर पक्षाच्या बैठकी येऊन संघटनात्मक बांधणी करा, सत्ताधारी नेत्यांविरोधात बोला असा आदेशच पटोले यांनी खोसकर यांना दिला. काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी खोसकर यांची खरडपट्टी काढल्यावर खोसकर यांनी व्यासपीठावरच पटोलेंना हात जोडत पक्षाचा आदेश म्हणून जिल्हाभर बैठकी घेणार असल्याचे आश्वासन दिले. 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 15 आमदारांपैकी काँग्रेसचा एकमेव आमदार म्हणून खोसकर निवडून आले आहेत. मात्र खोसकर काँग्रेसचे 'तरी त्यांचा 'कनेक्ट' काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांशीच राहिला आहे. त्यामुळे खोसकर यांच्याबाबतीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या तक्रारी आहेत. त्याचा स्फोट सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीत पाहायला मिळाला. माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांनी खोसकर यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या. त्यावर पटोले यांनी आमदार खोसकर यांना सकाळी बोलावून घेत तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहात, कामासाठी गेलात ही वेगळी गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर खुलेआम जाणे योग्य नसून त्यांच्या व्यासपीठावर दिसता कामा नये, असा सज्जेड दमच पटोले यांनी दिला. यावेळी आमदार खोसकर यांनी आपला पक्ष आदेश पाळणार असल्याचे सांगत मतदारसंघात निधी आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र पक्ष बांधणीसाठी जिल्हाभर फिरणार असून माझ्यावर काही मतदारसंघाची  जबाबदारी द्यावी, मी पक्षाचे आमदार निवडून आणेन, अशी ग्वाही यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.


काही लोक आमदारांची गिणती लावतात 


दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले की, पक्षशिस्त किंवा ईतर गोष्टीबाबत अध्यक्ष म्हणून माझे ते कामच आहे. बैठकीत हिरामण खोसकरच नाही तर अनेक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आमदार खोसकर फार आनंदी आहे, त्यांना काँग्रेस हाच पर्याय आहे, काही लोक आपल्याला पालकमंत्री होता, यावे म्हणून आपली गिणती लावतात, असा प्रत्यक्ष टोला नाना पटोले यांनी छगन भुजबळांना लगावला. कारण काही दिवसांपूर्वी याच प्रकरणावरून खोसकर आमचेच असल्याचे भुजबळांनी म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या दौऱ्यात हिरामण खोसकर दिसले. त्यावरून नाना पटोले यांनी खोसकर यांना सुनावले. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समिती निवडणुकीत राजकारण पेटलं, आमदार हिरामण खोसकरांना धमकीचा फोन