एक्स्प्लोर

Health Tips : तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल; तर 'या' पेयांचा तुमच्या आहारात समावेश करा

Health Tips : प्रत्येक वयात मेंदू सक्रिय ठेवणं महत्त्वाचे असते, परंतु काही वेळा वाढत्या वयामुळे मेंदू योग्यरित्या कार्य करू शकत नाही.

Health Tips : वाढत्या वयामुळे स्मरणशक्ती कमकुवत होणं हे स्वाभाविक आहे, पण कमी वयात छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे ही मात्र चिंतेची बाब आहे. मेंदू नीट काम करत नसेल तर कोणतेही काम करण्यात मन रमत नाही. अशा वेळी तुमच्या स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते. चला तर मग जाणून घेऊयात या हेल्दी ड्रिंक्सबद्दल.

बीट ज्यूस

कंदमुळांच्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला बीटचे फायदे माहित असणं गरजेचं आहे. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळतात. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी बीटचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा रस रोज प्यायल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. याशिवाय बीटमध्ये असलेले नायट्रेट उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात.

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी प्यायल्याने मूड सुधारतो असे अनेक संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे तुम्हाला आराम वाटतो आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता.

हळदीचा चहा (Turmeric Tea)

औषधी गुणधर्मांनी समृद्ध हळदीचा चहा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो. त्यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे मेंदूची सूज कमी होते. हा चहा नियमितपणे प्यायल्याने अल्झायमरचा धोकाही कमी होऊ शकतो.

बेरी ज्यूस

पोषक तत्वांनी युक्त बेरीचा रस स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतो. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात. यामध्ये असलेले अँथोसायनिन्स स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.

हिरवा रस (Green Juice)

आपल्या सर्वांना माहित आहे की, हिरवा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक ते एनर्जी ड्रिंक म्हणूनही पितात. हा रस तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास आणि अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यात मदत करतात. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल तर तुम्ही पालकाचा रसचा आहारात समावेश करू शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget