जालना : मराठा समाजाला (Maratha Reservation)  सरसकट ओबीसीमधून (OBC)  आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे.  जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहचले आहे. आंदोलनासाठी परवानगी नाही मिळाली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील आणि नागपुरातील दारात बसू असा इशारा मनोज जरांगेनी केली आहे. 20 जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले. 


मनोज जरांगे म्हणले,  मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणार आहे. परवानगी नाही मिळाली तरी निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणार आहे. खूप ताकतीने समाज एकत्र येणार आहे. मुंबईतील समाजाने एकत्रित यावं. आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील आणि नागपूरातील घरासमोर बसणार आहे.मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. मराठा बांधवांनी घाबरू नये उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.


मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलन येतील, जरांगेंचा दावा


मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलन येतील,  असा दावा जरांगेंनी केला आहे.  मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. आम्ही  मुंबईला जाणारच आहे. मुंबईला जाण्यासाठी चार दिवस लागू दे किंवा आठ दिवस लागू दे 20 जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदाने लागणार आहेत.त्यामुळे आाता सरकारची जबाबदारी त्यांनी मैदान द्यावीत. आमची दिशा मुंबई आणि  ध्येय आरक्षण आहे.  सर्व जण पायी मुंबईला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले. 


मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आज मुंबईत


मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईत आज मैदानाची पाहणी आणि नियोजन केले जाणार आहे.  20 जानेवारीपासून मनोज जरांगे यांचे नेतृत्वात मराठा समाजाच मुंबईत आंदोलन होणार आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत मैदानाची पाहणी करण्यासाठी आणि यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आलेत.  मुंबईतील मराठा समाजाच्या समन्वयकांशी हे शिष्टमंडळ आज अकरा वाजता चर्चा करेल आणि नंतर आज तीन मैदानांची पाहणी करेल.  यामध्ये मुंबईतील आजाद मैदान , छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि बीकेसी वांद्रे येथील मैदान असणार आहे.


हे ही वाचा :


20 जानेवारीला मनोज जरांगेची मुंबईकडे कूच, ओबीसी नेत्यांनीही आंदोलनाची मागितली परवानगी, सरकार काय भूमिका घेणार?