Health Tips : भारतीय घरांमध्ये शतकानुशतके तूप (Ghee) आणि लोणीचा (Butter) वापर केला जातो. या दोन्हीमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळून येते, ज्याचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश केल्यास हार्मोन्स निर्मिती आणि पेशी निर्मितीमध्ये खूप फायदा होतो. पण, ज्या लोकांना लठ्ठपणा किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांना तूप आणि लोणीपासून दूर राहण्यास सांगितले जाते किंवा ते कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच, बहुतेक लोक हिवाळ्यात तूप आणि लोणी खाण्यास सुरुवात करतात. तरुण पिढीबद्दल बोलायचे झाले तर काहींना तूप आवडते तर काहींना लोणी खायला आवडते. पण शेवटी, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणते चांगले आहे, तूप की लोणी? याबद्दल, सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट आणि क्लिनिकल आहारतज्ञ नेमकं काय म्हणतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आरोग्यदायी काय फायदेशीर, तूप की लोणी?
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट कविता देवगण सांगतात की, तूप आणि लोणी दोन्ही हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण, मर्यादित प्रमाणातच याचं सेवन करावं. पोषणतज्ञ कविता सांगतात की, दोन्हीमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. भारतात, सर्व प्रकारच्या करी, डाळ आणि हलवा बनवताना तुपाचा वापर केला जातो.
क्लिनिकल आहारतज्ञ म्हणतात की, लोणी आणि तूप हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. लोण्यापेक्षा तुपाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो, जो उच्च तापमानात शिजवण्यासाठी योग्य असतो. तुपाचा हा गुण हिवाळ्यात फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय, तुपात दुधाचे घन पदार्थ नसल्यामुळे, ज्यांना लॅक्टोज किंवा दुग्धजन्य पदार्थांची समस्या आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः चांगले असू शकते.
हिवाळ्यात किती प्रमाणात खावे?
पोषणतज्ञ कविता सांगतात की, हिवाळ्यात 3 ते 6 चमचे तूप किंवा लोणी खाऊ शकता. तसेच, जर तुम्हाला कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात लोणी आणि तूप दोन्ही तुम्ही खाऊ शकता पण ते माणसाच्या आरोग्य आणि आहाराशी संबंधित गोष्टींवर अवलंबून असते. तसेच, ते केवळ मर्यादित प्रमाणातच खाणे चांगले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.