Health Tips : तुम्हालाही जेवणानंतर आंबट फळं (Sour Fruits) खाण्याची सवय आहे का? संत्री, लिंबू, द्राक्ष किंवा कीनू ही सगळी आंबट फळं आहेत जी खरंतर फार स्वादिष्ट आहेत. या फळांमध्ये व्हिटॅमिन सीचं (Vitamin C) प्रमाण फार जास्त असतं. ही अशी फळं आहेत जी शरीरातील कोलेजन वाढविण्यासाठी फार मदत करतात. शरीरातील लोहाची कमतरता वाढविण्यासाठी तुम्ही या फळांचं सेवन करू शकता. जरी आंबट फळांचे अनेक फायदे असतील पण जेवणानंतर तुम्ही कधीही ही फळं खाणं योग्य नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला जेवणानंतर आंबट फळं खाण्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात हे सांगणार आहोत. 


आंबट फळांचं सेवन केल्याने काय फायदे मिळतात? 


या संदर्भात आहार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, आंबट फळांमध्ये डायट्री संबंधित फायबरचं प्रमाण असतं. यामुळे ही फळं बद्धकोष्ठतेत फार महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच, यामुळे तुमची पचनशक्ती देखील चांगली राहते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास फायदेशीर असतात. पण, जेवणानंतर या फळांचं सेवन करू नये. 


जेवणानंतर आंबट फळांचं सेवन केल्याने काय नुकसान होते? 


1. अॅसिडीटीचा त्रास 


आंबट फळं ही आम्लयुक्त असतात. दुपारच्या जेवणानंतर आंबट फळांचं सेवन केल्याने काही लोकांना अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. तसेच, यामुळे अस्वस्थता, अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे त्यांनी या फळांचं सेवन करू नये. 


2. पचनासाठी फार कठीण 


जेवणानंतर सरळ या आंबट फळांचं सेवन केल्याने काही अंशी शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता जाणवते. तसेच, यामुळे शरीरातील आवश्यक खनिजे आणि व्हिटॅमिन्सची कमतरता शरीरात भासते. तसेच, तुम्हाला फळ खाण्याचा आनंदही घेता येत नाही.


3. पोटासाठीही घातक 


काही व्यक्तींना जेवणानंतर आंबट फळ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लेम्स जसे की, पोटात दुखणे, सूज येणे किंवा गॅसची समस्या उद्भवते. विशेषत: ज्यांची पचनशक्ती संवेदनशील आहे अशा लोकांनी आंबट फळांचं सेवन करू नये. त्यामुळे तुम्हाला जर यापैकी कोणत्याही समस्या असतील तर आंबट फळांचं सेवन करू नये. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर