Health Tips : कांद्याची पात (Green Onion) ही एक भाजी आहे जी कोणत्याही भाजीत घातल्यास ती चवदार आणि स्वादिष्ट बनते. त्यामुळे याचा उपयोग भाज्यांमध्ये केला जातो. कारण त्यामुळे भाज्या दिसायला अधिक आकर्षक होतात. कांद्याची पात कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. ज्याचा आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. विशेषत: हृदयरोगी आणि वृद्ध लोकांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. चला जाणून घेऊयात कांद्याची पात आपल्या हृदयासाठी इतकी उपयुक्त का आहे.
कांद्याची पात हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे
- कांद्याच्या पातीमध्ये असलेले Quercetin हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयरोगांपासून संरक्षण करते.
- यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
- कांद्याच्या पातीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
- यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.
- कांद्याच्या पातीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात ज्यामुळे सूज कमी होते.
- कांद्याच्या पातीचे नियमित सेवन केल्याने रक्तवाहिन्या लवचिक आणि निरोगी राहतात.
कांद्याच्या पातीचा कसा वापर कराल?
सॅलड म्हणून - कांद्याची पात पातळ कापून सॅलडमध्ये घाला. त्यात टोमॅटो, काकडी आणि लिंबाचा रस घाला.
सँडविचमध्ये - ब्रेडवर कांद्याची पात, टोमॅटो आणि इतर भाज्या घालून सँडविच बनवा.
चटणीमध्ये - कांद्याची पात बारीक चिरून चटणीमध्ये घाला.
सूपमध्ये - तुम्ही कांद्याची पात आणि इतर भाज्यांचे सूप बनवून ते पिऊ शकता.
रसामध्ये - कांद्याच्या पातीचा रस पिणे फायदेशीर आहे.
अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आणि आपले आरोग्य निरोगी ठेवू शकता. त्याचप्रमाणे कांद्याची पात प्रत्येक वयोगटातील लोकांना खायला वेगवेगळ्या प्रकारे आवडते तर याचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. विशेषत: ही बाराही महिने आढळणारी भाजी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :