Mental Peace Tips : इतरांना आनंदी कसं ठेवायचं? याबद्दल तुम्हाला अनेक ठिकाणी माहिती मिळेल, अनेकजण तुम्हाला याबाबतीत सांगतीलही. पण, स्वतःला आनंदी कसं ठेवायचं? याबाबत फार कमी चर्चा केली जाते. खरंतर, इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वात आधी स्वत: आनंदी असणं महत्त्वाचं आहे. पण, जर तुम्ही स्वत:लाच आनंदी ठेवू शकत नसाल, मानसिक शांतता (Mental Peace) देऊ शकत नसाल तर तुम्ही इतरांनाही आनंद देऊ शकणार नाहीत. यासाठी आम्ही तुम्हाला काही सुखी जीवनाचं रहस्य सांगणार आहोत ते तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.
टॉक्सिक लोकांपासून दूर राहा
अनेक वेळा, कुटुंब, मित्र आणि जोडीदाराच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा असतात. कुटुंबाच्या, मित्र परिवाराच्या आनंदासाठी आपण अनेकदा अनेक गोष्टींशी तडजोड देखील करतो. पण तरीही, समोरच्या व्यक्तीचं त्याने समाधान होत नसेल तर स्वत:च्या मनशांतीसाठी, आनंदासाठी नात्यातून वेळीच दूर होणं गरजेचं आहे.
तणावपूर्ण वातावरणात राहू नका
तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे काम करता? या गोष्टी तुमच्या वागण्यावरून तुमच्या आयुष्यावरही खोलवर परिणाम करतात. तणावपूर्ण वातावरणामुळे तुमचा आनंद आणि शांती दोन्ही गोष्टी हरवतात. अशा वेळी जर तुम्हाला स्वतःची काळजी असेल तर अशा वातावरणापासून ताबडतोब दूर व्हा. आणि स्वत:साठी वेळ काढा.
विक्टीम कार्ड खेळू नका
जर तुम्ही तुमच्या सर्व समस्यांसाठी बाह्य परिस्थितीला, इतरांना दोष देत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनावरील नियंत्रण गमवत आहात. असे करणाऱ्यांचे मन कधीच शांत राहत नाही. काही काळानंतर कुटुंबातील सदस्यही तुमच्या अशा वागण्याला कंटाळतील. अशा परिस्थितीत, आपल्या चुका आणि दुःखाची जबाबदारी आपण समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी नेहमी लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.
इतरांच्या आनंदाची जबाबदारी घेऊ नका
तुम्ही प्रत्येकाला आनंदी तर ठेवू शकत नाहीत. यासाठी प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा अट्टाहास करू नका. ज्या व्यक्ती तुमच्या जवळच्या आहेत त्यांचीच काळजी घ्या आणि त्यांच्याच आनंदाचा विचार करा. यामुळे तुम्हालाही समाधानी वाटेल. पण, स्वत:ला त्रास करून, तुमच्या आवडी-निवडीशी तडजोड करून प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :