Health Tips : अनेकदा आपण गोंधळून जातो की कार्ब्स असलेले कोणते पदार्थ आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहेत आणि कोणते हानिकारक आहेत. असं म्हटलं जातं की, संतुलित आहारात (Food) कार्ब्सचाही समावेश असावा. जास्त कार्बोहायड्रेट खाल्ल्याने वजन वाढू शकते. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्याचे आवश्यक प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे, तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे या मॅक्रोन्यूट्रिएंट्सबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कॉम्प्लेक्स कार्ब्स
ज्या अन्नपदार्थांमध्ये फायबर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते ते पचायला जास्त वेळ लागतो. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्स यांचाही समावेश होतो. हे संथ गतीने ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पोट भरल्यासारखे वाटते. संपूर्ण धान्य, बीन्स, क्विनोआ, शेंगा, ओट्स आणि तांदूळ हे कॉम्प्लेक्स कार्ब्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
साधे कार्बोहायड्रेट
फळे, भाज्या, दूध, तांदूळ, मैदा, साखर आणि सोडा यांसारख्या नैसर्गिक किंवा साखर असलेले अन्नपदार्थ फार लवकर आणि सहज पचतात. यापैकी काही पदार्थांमध्ये भरपूर पोषण असते. फळांमध्ये जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. तर, दुधात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
कमी कार्ब्स आहार समजून घ्या
चांगल्या कार्ब्समध्ये दैनंदिन कॅलरीच्या 40-50 टक्के समावेश असावा. निरोगी आणि संतुलित आहारामध्ये चांगल्या कार्ब्सबरोबर काही प्रमाणात प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे. आजकाल लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी कमी कार्बयुक्त आहार घेतात. ज्यामध्ये सॅलडमध्ये धान्य, भाज्या आणि फळे, उच्च प्रथिने आणि चरबी यांसारखे चांगले कार्ब्स खाणे टाळले जाते. त्यामुळे नो डाएट वजन कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र, टाईप-2 मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका देखील वाढवते. कमी कार्ब्सयुक्त आहार दीर्घकाळ घेतल्याने शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता, हाडे कमजोर होणे आणि पचनाच्या समस्या वाढतात.
अन्नपदार्थ जसे की, धान्य (ओट्स, बाजरी, नाचणी, ज्वारी, गहू), फळांची साल, कडधान्ये आणि हिरव्या भाज्या हे सर्व चांगल्या कार्ब्सचे स्रोत आहेत कारण त्यात भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे निरोगी साखरेची पातळी राखण्यात मदत करतात आणि चांगल्या पोषणाबरोबरच तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. तर बिस्किटे, सोडा ड्रिंक्स, मिठाई, मैदा हे वाईट कार्ब्स आहेत. यामध्ये पोषक आणि फायबर कमी प्रमाणात आढळतात. हे कॅलरी तसेच साखरेचे प्रमाण वाढवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :