एक्स्प्लोर

Health Tips : थायरॉईड झाल्यास कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत? याबाबत संभ्रम असेल तर ही माहिती नक्की वाचा...

Health Tips : थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Health Tips : सध्याच्या काळात थायरॉईड (Thyroid) हा अगदी सामान्य आजार झाला आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकते. अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे हे थायरॉईडचे प्रमुख लक्षण मानले जाते. थायरॉईडमुळे केवळ वजनाची समस्याच नाही तर तणाव, पीसीओडी समस्या, झोपेमध्ये अडचण आणि चिंता देखील होते. यामागे अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, आयोडीनची कमतरता किंवा तणाव यांसारखी अनेक कारणे असू शकतात.

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थायरॉईड झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. तुमचाही गोंधळ होत असेल तर या ठिकाणी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

थायरॉईड रोग म्हणजे काय?

थायरॉईडला वैद्यकीय भाषेत हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम म्हणतात. आपल्या घशात एक ग्रंथी असते ज्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायओडोथायरोनिन (T3) हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईड रोग होतो.

तज्ञ काय म्हणतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते थायरॉईड होण्याची अनेक कारणे आहेत. आहाराव्यतिरिक्त शरीरात सूज आल्यानेही ही समस्या उद्भवते. एक काळ असा होता की हा आजार 50 ते 60 वयोगटातील लोकांना होत होता.  पण आता लहान मुलांना देखील याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.  

थायरॉईडमध्ये काय खावे?

जर तुम्हाला थायरॉईड असेल तर अंडी, धान्य खाऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अंड्यांमध्ये सेलेनियम असते जे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. काजू खाल्ल्याने हार्मोनल संतुलन सुधारण्यासही मदत होते. जर एखाद्याला अशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खाव्यात.

आजारपणात 'या' पदार्थांपासून दूर राहा 

सोयाबीन किंवा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉईडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित असावे. तुम्हाला हा आजार असल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढू शकते. कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी टाळा, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. या पदार्थांमध्ये थायरॉईडविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हा आजार वाढू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget