Skin Care Tips : सुरकुत्या (Wrinkles) आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा हा वृद्धत्वाचा एक भाग आहे जो कदाचित कोणालाही आवडत नाही. वृद्धत्वाच्या काळात तुमचा आहार आणि जीवनशैली खूप महत्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर नाहीत. या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही वेळेपूर्वीच म्हातारे दिसू शकता.
आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्याचा आपल्या जीवनावर, शरीरावर आणि सौंदर्यावर तसेच वृद्धत्वाशी संबंध असतो. त्यामुळे आजाराशी निगडीत कोणत्याही समस्या आपल्या चेहऱ्यावर आधी दिसतात. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांना पाहिलं आहे, अगदी लहान वयातच त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. याची खरंतर अनेक कारणं आहेत. त्वचा तरूण आणि तजेलदार ठेवण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते.
वयानुसार त्वचा सैल पडू लागते. आणि त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या वाढू लागते. चांगला आहार घेतल्यास तुमची त्वचा घट्ट राहते आणि कोलेजन देखील योग्य प्रकारे तयार होते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या त्वचेसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. आणि वृद्धत्वाच्या आधीच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. अशा वेळी जर तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे दिसायचे नसेल तर या गोष्टींपासून दूर राहा.
तळलेले अन्न : अनेकांना तळलेले पदार्थ खायला फार आवडतात. अशा पदार्थांचे सेवन कधीतरी ठीक आहे. मात्र, वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या चोहऱ्यावर दिसतो. यासाठी तळलेल्या पदार्थांचं सेवन फार कमी करणे गरजेचे आहे.
साखरेचे प्रमाण कमी करा : साखरेचा आपल्या आरोग्यावर फार घातक परिणाम होतो. यासाठी आरोग्य तज्ज्ञदेखील आहारातील साखरेचे प्रमाण कमी करायला सांगतात. आहारातील अति प्रमाणात साखरेच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील चमक निघून जाते. साखर कोलेजन उत्पादक AGE च्या निर्मितीला प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण वाढते.
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा : अनेकांची या संबंधित वेगळी मतं असू शकतात. कारण अनेकांना दुग्धजन्य पदार्थ खाणं शरीरासाठी, त्वचेसाठी फायद्याचं वाटतं. तर, अनेकांसाठी ते नुकसानकारक ठरू शकतं. काहींना दुग्धजन्य पदार्थांमुळे त्वचेच्या समस्या जाणवतात. तर, अनेकांच्या त्वचेवर कोणताही परिणाम दिसत नाही. दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरात सूज वाढते. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव जाणवतो. आणि तुम्ही वेळेच्या आधीच वृद्ध दिसू लागता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :