Health Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयाशी संबंधित आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. हृदयविकाराची समस्या दररोज लोकांमध्ये दिसून येते. हल्ली तरुण-तरुणी हार्ट अटॅकचे बळी ठरत आहेत. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या हृदयाची काळजी घ्यावी लागेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलावी लागेल. चला तर मग जाणून घेऊयात हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात.


संतुलित आहार घ्या


हृदय निरोगी ठेवण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यामध्ये संपूर्ण धान्य, शेंगा, हंगामी फळे, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे. हे आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.


पुरेशी झोप घ्या


आपले हृदय 24 तास कार्य करते, त्यामुळे ते निरोगी राहण्यासाठी तणाव कमी करा. तणाव कमी करून, बीपी सामान्य राहण्यास मदत होते. अशा परिस्थितीत रोज 7 ते 8 तास झोप घेतल्याने आपला ताण कमी होण्यास मदत होते आणि मनाला शांतीही मिळते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.


योग आणि व्यायाम करा


शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून नियमितपणे अर्धा ते एक तास योगासने किंवा व्यायाम करा.


ग्रीन टी प्या


ग्रीन टीचे नियमित सेवन सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.


वजन नियंत्रणात ठेवा


शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी हृदयासाठी धोक्याची सूचना आहे, त्यामुळे तुमच्या उंचीनुसार वजन नियंत्रित ठेवा.


मासे खा


ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये चांगली चरबी असते जी कोलेस्ट्रॉल राखण्यास मदत करते, म्हणून सॅल्मन आणि ट्यूना सारख्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले मासे खा. यामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.


मादक पदार्थांचं सेवन करू नका 


धूम्रपान आणि अतिमद्यपान केल्याने हृदय, फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याची भीती असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Women Health Tips : मासिक पाळी दरम्यान व्यायाम करावा की करू नये? स्त्रियांमध्ये हार्मोनल बदलांवर कसा परिणाम होतो? वाचा सविस्तर