Health Tips : भारतीय मसाल्याच्या पदार्थांमधील लवंग, दालचिनी, बडीशेप, काळी मिरी यांसारखे पदार्थ जेवणाची चव आणखी वाढवतात. पण, जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने देखील हे पदार्थ फार उपयोगी आहेत. या मसाल्याच्या पदार्थांचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. अशाच काही मसाल्याच्या फायद्यांबद्दल माहिती आम्ही सांगणार आहोत. या मसाल्यांच्या पदार्थांचे पाणी प्यायल्यास शरीरातील अनेक समस्या दूर होतील. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊयात 


त्वचेसाठी फायदेशीर 
 
ओवा आणि बडीशेप हे दोन्ही मसाल्यातील पदार्थ त्वचेसाठी खूप गुणकारी आहेत. यामध्ये तुम्ही जर ओवा आणि बडीशेपचं पाणी एकत्र प्यायलात तर तुम्हाला तुमच्या त्वचेवर काही दिवसांतच फरक जाणवेल. तुमच्या त्वचेला अधिक चमक येईल. ओवा आणि बडीशेप हे त्वचा  डिटॉक्सिफाय करते आणि त्वचेवरील मुरुम आणि डाग घालवण्यास मदत करते. 


सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय 
 
बडीशेप आणि ओवा सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय मानला जातो. ओवा आणि बडीशेपचे पाणी प्यायल्याने घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. 


कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत 


बडीशेप आणि ओव्याचे पाणी हे तुमच्या शरीरातील वाढणारे कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. या पाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, जे वाढते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 
 
पोटाच्या समस्येपासून सुटका मिळते


बडीशेप आणि ओव्याचे पाणी तुमची पचनक्रिया मजबूत करते. यासोबतच हे पाणी प्यायल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या दूर होतात. 


काही लोकांना सकाळी उठल्यानंतर उलट्या, मळमळ आणि अस्वस्थता जाणवते. अशा वेळी ओवा आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास मॉर्निंग सिकनेसची समस्या दूर होते. आणि काही वेळातच तुम्हाला फ्रेश वाटेल.  


ओवा आणि बडीशेपचे पाणी कसे वापराल? 


सर्वात आधी ओवा आणि बडीशेपची बारीक पावडर तयार करा. त्यानंतर रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर याचे सेवन करा. काही दिवसांतच तुमच्या शरीरात चांगले बदल दिसू लागतील. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :