Health Tips : आजच्या बिघडत्या जीवनशैलीमुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार निर्माण होतात. म्हणूनच डॉक्टर योग्य वेळी जेवण्याचा आणि झोपण्याचा सल्ला देतात. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांचा समावेश असलेला संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण भोपळ्याच्या बियांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सेवन पुरुषांनी केलेच पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घ्या.
भोपळ्याच्या बियांचे फायदे काय आहेत?
भोपळ्याची भाजी खायला चविष्ट तर असतेच पण तिचे फायदेही अनेक आहेत. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स, झिंक आणि फॅटी अॅसिड मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, निद्रानाश, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम देतात.
मधुमेहावर फायदेशीर : त्याचबरोबर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन अवश्य करावे. त्याच्या सेवनाने लैंगिक आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळीही चांगली राहते.
ऊर्जा मिळते : ज्या पुरुषांना अशक्तपणाची समस्या आहे त्यांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन सुरू करावे. याच्या बिया तुम्हाला ऊर्जावान बनवण्यात खूप मदत करतात. तुम्ही भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्सच्या स्वरूपातदेखील खाऊ शकता. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय दोन्ही मजबूत करते.
त्वचा निरोगी राहते : इतकेच नाही तर त्वचादेखील याच्या वापराने निरोगी राहते. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ए भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात, जे चेहरा तजेलदार बनविण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे डार्क सर्कल्सही कमी होतात.
तणावमुक्त होतो : भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तणाव दूर होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते जे तुम्हाला शांत ठेवते. त्यात बी जीवनसत्त्वे आणि झिंक देखील असतात. ते तणाव दूर करण्यास मदत करतात.
शांत झोप लागते : जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. या बियांच्या सेवनाने शांत झोप लागते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत : भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक वाढायला मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :