MS Dhoni tractor : कॅप्टन कूल एमएस धोनीचं बाईक प्रेम जगजाहीर आहे. पण सध्या धोनी शेतीमध्ये रमल्याचं दिसतेय. लॉकडाऊनच्या काळात धोनी शेतात घाम गाळत असल्याचे पाहायला मिळाले होतं. आता धोनी पुन्हा एकदा शेतात रमल्याचं पाहायला मिळालेय. धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. एमएस धोनीनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्या व्हिडीओत धोनी शेतात ट्रॅक्टर चालवत असल्याचं दिसतेय.
धोनीनं तब्बल दोन वर्षानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तोही शेतात ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ आहे. कोरोना काळात धोनीने टमाटर, गोबी, पपई अश्या अनेक फळ भज्यांची लागवड केली आहे. फावल्या वेळात धोनी शेतामध्ये आणि बाईकमध्ये आपला दिवस घालवत असतो... धोनीने शेतात ट्रॅक्टर चालवून नांगरणी करण्याचा आनंद घेतला आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करताना धोनीनं कॅप्शनमध्ये म्हटले की, "काहीतरी नवीन शिकून आनंद झाला, पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला."
पाहा धोनीनं पोस्ट केलेला व्हिडीओ ....
धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव झालाय.
एमएस धोनी हा जगातील महान कर्णधारांपैकी एक आहे. धोनीनं भारताला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. मात्र निवृत्तीनंतर माही आपल्या आयुष्याचा आनंद लुटताना दिसत आहे. तो सध्या शेतीत रमला आहे. पण आयपीएलच्या आगामी हंगामात धोनी चेन्नई संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याआधी धोनी शेतकरी झाल्याचं पाहायला मिळालेय.