Weight Loss Tips : वजन कमी  (Weight Loss) करण्यासाठी डाएट करणे आणि व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) तुम्हाला ब्रेकफास्ट (Breakfast), लंच (Lunch) आणि डिनर  (Dinner) च्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम देखील केला पाहिजे. जर तुम्हाला हेल्दी  सलाड खायचं असेल तर तुम्ही डाएटमध्ये  सलाडचा समावेश करू शकता.  सलाड खाल्ल्यानं पोषक तत्त्वे आणि व्हिटॅमिन मिळतात.


कोबी आणि टोमॅटोचे सलाड
कोबी आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. तसेच  मॅग्नीशियम, आयरन, सल्फर आणि कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वे देखील कोबी आणि टोमॅटोच्या सलाडमध्ये असतात. हे  सलाड खाल्ल्यानंतर इम्यूनिटी वाढते. 


पाहा कोबी आणि सलाड तयार करण्याची सोपी पद्धत- कोबी आणि दोन टोमॅटो घ्या. तसेच एक काकडी देखील कापून घ्या. त्यानंतर कापलेली काकडी, चिरलेला कोबी आणि कापलेले टोमॅटो हे एकत्र मिक्स करून त्यामध्ये तुळशीची पाने, आलं आणि लिंबूचा रस मिक्स करा. हे सलाड सकाळी नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता. 


किवी सलाड
किवी आणि स्ट्रॉबेरीच्या या सलाडमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. ज्यांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, अशांनी किवी आणि  स्ट्रॉबेरीच्या सलाडचा समावेश डाएटमध्ये करावा. 


किवी आणि स्ट्रॉबेरीचं  सलाड तयार करायची पद्धत-
किवी आणि स्ट्रॉबेरी बारीक कापा. त्यामध्ये केळी, द्राक्ष आणि ब्लू बेरी मिक्स करा. त्यानंतर या  सलाडमध्ये मिठ आणि जिऱ्याची पावडर मिक्स करून खा. हे  सलाड तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha