Book Reading Before Sleeping : असं म्हणतात की पुस्तक हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो. पुस्तकांमुळे तुम्हाला अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळते. तसेच, एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही घडत असता. तुम्हाला जर कोणी मित्र-मैत्रीण नसेल तर तुम्ही पुस्तकांशी मैत्री करू शकता. आजकाल डिजिटल जगात अनेकजण ऑनलाईन पुस्तकं वाचत असली तरी मात्र, हातात पुस्तक घेऊन वाचण्याची गंमत वेगळीच आहे. तज्ज्ञदेखील म्हणतात की, रात्री फक्त 15 ते 20 मिनिटं पुस्तक वाचणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.


पुस्तक वाचण्याचे फायदे जाणून घ्या. 


तणाव दूर करा : रात्री झोपण्यापूर्वी एखादी चांगली कथा कादंबरी वाचल्याने तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते. खरंतर, जेव्हा तुम्ही दिवसभर ऑफिस किंवा घरातील काम करता तेव्हा मेंदू खूप थकतो, विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. अशा वेळी तुम्ही एखादी कादंबरी वाचली, तर तुम्ही तुमचा ताण विसरू शकता. 


मेंदू योग्यरित्या कार्य करतो : मेंदूच्या योग्य कार्यासाठी ज्या प्रकारे योगासन आणि व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पुस्तक वाचणे हा देखील एक व्यायाम आहे जो तुमचे मन तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. 


सकारात्मकता वाढते : जेव्हा तुम्ही पुस्तके वाचता तेव्हा तुम्हाला इतरांची जीवनकथा, त्यांचा संघर्ष, त्यांच्या समस्या समजून घेण्याची संधी मिळते. संघर्षानंतर एखादी व्यक्ती त्यातूनही बाहेर पडू शकते हे तुम्ही समजण्यास सक्षम असता. जेव्हा तुम्ही हे सर्व पाहता तेव्हा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. झोपण्यापूर्वी 15 किंवा 20 मिनिटे दररोज पुस्तके वाचा, त्यामुळे नकारात्मकता दूर होते. 


सर्जनशीलता वाढते : कोणतेही पुस्तक वाचले तरी त्यातून काहीतरी शिकायला मिळते. तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. तुम्ही जसजसे नवीन गोष्टी वाचता, तुमची सर्जनशीलता वाढते आणि जेव्हा सर्जनशीलता वाढते. जेव्हा तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. 


तुम्ही संवेदनशील बनता : तुम्ही एकटे बसून पुस्तके वाचता तेव्हा तुम्ही खूप संवेदनशील होता. पुस्तकांमध्ये दडलेल्या कथा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. पुस्तक तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवण्यात मदत करते.


चांगली झोप येते : कोरोनानंतर लोकांच्या झोपण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. लोक झोप न येण्याच्या तक्रारी करत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तके वाचण्याची सवय तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्त करू शकते. एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, पुस्तक वाचल्याने तणावाची पातळी 68% कमी होते. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचले तर तुम्हाला चांगली झोप येईल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Health Tips : महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी काळजी घ्या; दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार, 'ही' आहेत लक्षणं