Hina Rabbani Khar Over PM Modi: पाकिस्तान संध्या आर्थिक संकटात आहे. त्यांच्या पंतप्रधान मोदींसोबत शांतता चर्चा करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, याला दोन दिवसही उलटले नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानच्या राज्यमंत्री हिना रब्बानी खार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल बरळल्या आहेत. पण त्याच स्टेजवर असणारे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी हिना रब्बानीला आरसा दाखवला. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत साऊथ एशियावर आयोजित एका सत्रात हिना रब्बानी आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर सहभागी होते. यावेळी हिना रब्बानी यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल गरळ ओकण्यास सुरुवात केली होती. 
 
दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत होते. पण आता भारत आणि नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत नाही, असे हिना रब्बानी म्हणाल्या. परराष्ट्रमंत्री म्हणून जेव्हा मी भारतामध्ये गेले होते, तेव्हा चांगल्या सहकार्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सद्या असणाऱ्या स्थितीपेक्षा तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो, असेही रब्बानी म्हणाल्या. या वक्तव्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आरसा दाखवला. समस्या त्यांच्या बाजूने आहेत, हे पाकिस्तानला समजले पाहिजे. कारण भारताला इतर कोणत्याही शेजारी देशासोबत अडचणी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वत: विचार करावा, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. 


परराष्ट्रमंत्री म्हणून जेव्हा आम्ही भारतामध्ये गेले होते, तेव्हा चांगल्या सहकार्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सध्याच्या परिस्थितीपेक्षा तेव्हा चांगल्या स्थितीत होतो. आपण भौगोलिक परिस्थिती बदलू शकत नाही. हा दक्षिण आशियाचा नव्हे तर भारत-पाकिस्तानचा प्रश्न आहे. मुत्सद्दी कौशल्याच्या समस्या भारताकडूनच आहेत, असेही हिना रब्बानी म्हणाल्या.


पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी चांगले नेते असतील. पण पाकिस्तानसाठी त्यांच्याकडून सहयोग दिसत नाही. मनमोहन सिंह आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आम्ही सहयोगीच्या रुपात चांगले पाहिलेय, असेही रब्बानी म्हणाल्या.  दावोसमध्ये त्याच पॅनेलचा भाग असणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. ते म्हणाले की, 'समस्या पाकिस्तानकडून आहे, हे त्यांना माहित असायला हवं. कारण भारताला इतर शेजारी देशांकडून कोणत्याही समस्या नाहीत. दोन्ही देशांमध्ये समान भाषा बोलली जाते... संस्कृती आणि काण्यापिण्याची सवयीही एकसारख्याच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीसाठी अनेकदा हात पुढे केले आहेत, त्यामुळे हिना यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. '