Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुशांत आज या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी कायम आहेत. सुशांतच्या (Sushant Singh Rajput Birth Anniversary) जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता,"मला मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते". 


सुशांत मुंबईतील वांद्रे येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. या फ्लॅटमध्येच सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचं म्हटलं. आज सुशांतच्या मृत्यूला अडीच वर्षे झाली असली तरी त्याच्या मृत्यूचं रहस्य मात्र उलगडलेलं नाही. 


सुशांत एका मुलाखतीत म्हणाला होता,"मला सगळ्यात जास्त मृत्यूची भीती वाटते. कारण मी तीन तास झोपलो तरी आसपास काय सुरू आहे याचा मला अंदाज येत नाही. त्यामुळे या गोष्टीची मला सर्वात जास्त भीती वाटते आणि या गोष्टीचा विचार करुनच मी घाबरतो". त्यामुळे मृत्यूची सर्वात जास्त भीती वाटत असताना त्याने आयुष्य का संपवलं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


सुशांतची हत्या की आत्महत्या? 


सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हा प्रश्न अडीच वर्षानंतरही उपस्थित होत आहे. अद्याप त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही. त्याची हत्या की आत्महत्या यावरुन अनेक दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतची हत्या झाल्याचा दावा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने केला होता. 


सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता होता. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं होतं. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमध्ये झाला. शालेय शिक्षणादरम्यान त्याला कलेची आवड निर्माण झाली. पण सुशांतच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला कुटुंबीयांनी मात्र विरोध दर्शवला. पण सुशांत मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन अभिनयक्षेत्रात आला आणि अल्पावधीतच त्याने स्वत:ला सिद्ध केलं. 


'किस देश में है मेरा दिल' या मालिकेच्या माध्यमातून सुशांतने मनोरंजनक्षेत्रात पाऊल ठेवलं. पण 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेमुळे सुशांत घराघरांत पोहोचला. त्याची ही मालिका आणि मालिकेत त्याने साकारलेलं 'मानव' नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मालिकाविश्वासह सुशांतने बॉलिवूडमध्येदेखील स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


सुशांत सिंह राजपूतचे गाजलेले सिनेमे : (Sushant Singh Rajput Popular Movies)


शुद्ध देसी रोमान्स (Shuddh Desi Romance)
पीके (PK)
एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story)
राब्ता (Raabta)
वेलकम टू न्यूयॉर्क (Welcome to New York)
केदारनाथ (Kedarnath)
छिछोरे (Chhichhore)
दिल बेचारा (Dil Bechara)


संबंधित बातम्या


Sushant Singh Rajput Birthday : कशी सुरु झाली सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी, जाणून घ्या...