Health Tips : आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी फळे अतिशय आवश्यक आहेत. तसेच, आरोग्यासाठीही फळे खाणे उत्तम ठरते. काही लोक फळे कापून किंवा त्याचे सलाड बनवून खातात. अशा सलाडमध्ये केळी (Banana) आणि पपई (Papaya) ही फळे देखील एकत्र असतात. पपईचे नियमित सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासोबतच कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. पपई हे फळ शरीरासाठी फायदेशीर देखील आहे.


दुसरीकडे, जर आपण केळ्यांबद्दल बोललो तर, केळी देखील भरपूर पोषक आहे. केळ्याच्या सेवनाने आपल्या शरीराला पोटॅशियम मिळते. त्याच वेळी, स्नायू देखील मजबूत होतात. अशा परिस्थितीत केळी आणि पपई एकत्र खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया...


केळी आणि पपई एकत्र खावी का?


केळी आणि पपईचे एकत्र सेवन करणे फायदेशीर आहे की नाही, हे पूर्णपणे आपल्या पाचन तंत्रावर अवलंबून असते. काही लोकांची पचनशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत जर, त्यांनी केळी आणि पपईचे एकत्र सेवन केले, तर त्यांचा त्रास वाढू शकतो. दुसरीकडे, ज्या लोकांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांना अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. आयुर्वेदात केळी आणि पपई ही एकमेकांविरुद्धची फळे मानली जातात. आयुर्वेदातही ते एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो. ही फळे एकत्र सेवन केल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर, तुम्ही केळी आणि पपई एकत्र खात असाल तर तुम्हाला अपचन, उलटी, मळमळ, गॅस इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


केळी आणि पपईचे एकत्र सेवन कोणी करू नये?


पपईमध्ये पपेन नावाचे तत्व असते, ज्यामुळे लोकांना समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पपईचे सेवन केल्याने श्वसनाचा त्रासही होऊ शकतो. केळी आणि पपई एकत्र खाल्ल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.


कावीळच्या रुग्णांनाही पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले पपेन आणि बीटा-कॅरोटीन कावीळची समस्या वाढवतात. त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. पपई आणि केळीचे एकत्र सेवन केल्यानेही पोट खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी देखील होऊ शकते.


यासोबतच, जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल, तर अशा परिस्थितीत संध्याकाळी केळी खाणे टाळावे. शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यास केळीचे सेवन करू नका. त्यामुळे शरीरात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha