Health Tips : उन्हाळ्यात फ्रीजचा वापर आपसूकच वाढतो. शरीराला, पोटाला थंडावा मिळण्यासाठी लोक भाज्या असो वा फळे विचार न करता फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. फ्रीजमध्ये फळे आणि भाज्या ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात असं तुम्हाला कदाचित वाटत असले. पण तुमचा हा गैरसमज आहे. काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात. सफरचंद, केळी, आंबा, लिची आणि टरबूज फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. फळं फ्रीजमध्ये ठेवल्याने नेमके कोणते नुकसान होते ते जाणून घ्या. 


आंबा : उन्हाळ्यात थंड-थंड आंबे खाणे खूप चविष्ट असते, पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवलेला आंबा तुमचे नुकसान करू शकतो. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि पोषक तत्वेही नष्ट होतात. म्हणूनच फ्रीजमध्ये आंबे कधीही ठेवू नका. 


टरबूज : टरबूज हे फळ इतके मोठे आहे की त्यांना एकाच वेळी खाणे कठीण होते. अशा परिस्थितीत लोक फ्रीजमध्ये टरबूज आणि कलिंगड कापून ठेवतात, जे चुकीचे आहे. यामुळे अँटिऑक्सिडंट्स नष्ट होतात. तुम्ही त्यांना खाण्यापूर्वी अर्धा तास ठेवू शकता. 


सफरचंद : सफरचंद बहुतेक घरांमध्ये फ्रीजमध्ये ठेवले जातात. यामुळे सफरचंद लवकर खराब होत नाहीत पण त्यातील पोषक घटक कमी होतात. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. सफरचंद जास्त काळ खराब होऊ नये म्हणून कागदात गुंडाळून ठेवा. 


लिची : लिची फ्रीजमध्ये ठेवल्याने लिची लवकर खराब होते. त्यामुळे लिची आतून वितळू लागते. थंड आणि रसाळ लिची उन्हाळ्यात चवदार असू शकतात, परंतु आपण ते फ्रीजमध्ये ठेवण्याचे टाळले पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवल्याने लिचीचा वरचा भाग तसाच राहतो. पण आतून लिची खराब होते. 


केळी : केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती खराब होऊन काळी पडू लागते. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेली इतर फळे लवकर पिकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha