Health Tips : मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील साखर वाढू लागते, ज्याचा अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे शरीराचे अनेक अवयव हळूहळू ढासळू लागतात. मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवतात आणि याचे कारण म्हणजे रक्तातील साखरेची वाढ शरीरातील शक्ती नष्ट करते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरातील शक्ती आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिने-कॅल्शियमयुक्त अन्न, स्नायू आणि हाडांचे आरोग्य सुधारण्याव्यतिरिक्त, शरीराच्या सर्व अवयवांना निरोगी ठेवतात.
मांस आणि अंडी
तुम्ही तुमच्या आहारात चिकन आणि मासे यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये सॅच्युरेटेड फॅटही कमी असते. अंडी उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे आणि मर्यादित प्रमाणात समावेश केला जाऊ शकतो.
मधुमेहामध्ये किती प्रोटीन आवश्यक आहे?
डेअरी प्रोडक्ट्स आणि पनीर
दूध, चीज आणि दहीमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. फॅट्सचे प्रमाण मर्यादित करण्यासाठी कमी फॅट्सयुक्त पदार्थांची निवड करा. पनीर हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे.
डाळी आणि ड्राय फ्रूट्स
मसूर, हरभरा आणि डाळींमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. या व्यतिरिक्त, बदाम, अक्रोड, चिया सीड्स हे प्रथिने आणि निरोगी चरबीचे चांगले स्रोत आहेत.
कॅल्शियमसाठी दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्या
दूध, चीज आणि दही हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचे रोज सेवन करावे. ब्रोकोली, पालक आणि कोबी यांसारख्या कॅल्शियम युक्त भाज्यांचेसुद्धा भरपूर सेवन करावे.
मासे
सॅल्मन आणि सार्डिनसारख्या माशांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला प्रोटीन आणि हेल्दी फॅटही मिळते. या व्यतिरिक्त, फोर्टिफाइड टोफू कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जो हाडांचे पोषण करण्यास मदत करतो.
बदाम
बदाम कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. त्यात प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम फोर्टिफाईड पदार्थ जसे की, काही तृणधान्ये, ज्यूस आणि वनस्पती आधारित दूध यांचा समावेश करावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :