Child Care Tips : आजकाल चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये (Web Series) अॅक्शन आणि क्राईम सीन्सचा वापर अगदी सर्रास केला जातो. कित्येकदा वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या या गुन्ह्यांचे पडसाद आपल्या आजूबाजूच्या परिसरात देखील पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी फक्त चित्रपटगृहांत किंवा टीव्हीवरच कार्यक्रम आणि चित्रपट पाहिले जात असायचे. पण, जेव्हापासून डिजीटल युग आलं आहे तेव्हापासून या माध्यमांमध्ये कंटेट प्रोव्हाईड करण्याचा स्पेस देखील वाढला आहे. आजका वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्याच हातात मोबाईल असल्यामुळे हे कंटेट अगदी सर्रास पाहिजे जातात. अशा वेळी, क्राईम सीन पाहिल्याने मुलांच्या मेंदूवर काही परिणाम होतो का हे जाणून घेणं गरजेचं आहे. 


सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं कित्येकदा म्हटलं जातं. पण, आजकाल या डिजीटल प्लॅटफॉर्मवरून जो कंटेट आणि दृश्य दाखवली जातात ती समाजात दहशत निर्माण करणारी असतात.  


क्राईम सीन्सचा मुलांच्या मेंदूवर काय परिणाम होतो? 


या संदर्भात मुंबईचे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर रूही सतिजा म्हणतात की, मालिका, वेबसीरिज आणि चित्रपटांत जेव्हा मुलं वारंवार क्राईम सीन्स पाहतात तेव्हा त्यांच्यात हिंसेची भावना निर्माण होऊ शकते. या कारणामुळे मुलांच्या विकासात हिसेंला चालना मिळू शकते. तसेच, मुलांचं वर्तनही आक्रमक आणि रागीट होऊ शकते. 


मुलांमध्ये भीतीची भावना वाढू शकते 


लहान मुलांमध्ये काल्पनिक आणि खरं आयुष्य यामध्ये फरक करणं थोडं कठीण जातं. या कारणामुळे अनेकदा क्राईम सीन्स पाहिल्यानंतर मुलांमध्ये आक्रमकतेबरोबरच भीतीची भावना देखील निर्माण होऊ शकते. 


पालकांची भूमिका काय असावी?


या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात की, क्राईम सीनचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी त्यांच्याशी बसून नीट संवाद साधावा. या व्यतिरिक्त मुलं जो कंटेट पाहत आहेत तो त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. पालकांनी जर योग्य वेळी आपली मुलं काय पाहतात आणि काय नाही यावर जर लक्ष दिलं तर समाजात गुन्हेगारीचं प्रमाण फारसं वाढणार नाही. तसेच, मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होणार नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुमच्या 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते; सुटका मिळवण्यासाठी 'हे' व्यायाम करा