एक्स्प्लोर

Health Tips : मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर 'या' गोष्टींवरही नियंत्रण ठेवा; निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय

Health Tips : मधुमेहाच्या रूग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फक्त गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

Health Tips : आजकाल मधुमेहाचं प्रमाण फार वाढत चाललं आहे. सामान्यत: मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांना गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फक्त गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. तर, यासाठी तुमच्या सवयी देखील कारणीभूत आहेत. त्यामुळे तुमच्या सवयींवर लक्ष ठेवणं तसेच त्या नियंत्रित ठेवणं गरजेचे आहे. या अशा कोणत्या सवयी आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टींवर नियंत्रण ठेवा

दररोज व्यायाम करा

मधुमेहापासून दूर राहण्यासाठी, दररोज किमान 30-40 मिनिटं शारीरिक हालचाली करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारखे व्यायाम केल्याने शरीरातून घाम गाळा. योग करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. अशी अनेक आसने आहेत, जी हार्मोन्स संतुलित ठेवतात, पचनसंस्था निरोगी ठेवतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. आसनांव्यतिरिक्त, ध्यानावर देखील लक्ष केंद्रित करा. यामुळे तणाव दूर होतो.

खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा

जर तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल. यासाठी निरोगी आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजून घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा कमी प्रमाणात खा. विशेषत: आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषण असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तळलेले, जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा. 

मीठ आणि साखरेवर नियंत्रण ठेवा

जेवणात मीठ घालण्याची सवय सोडून द्या. त्याचप्रमाणे मिठाईचे सेवन कमीत कमी प्रमाणात करा. रात्रीच्या वेळी आहारात मीठ आणि साखरेचा वापर पूर्णपणे टाळा. त्याऐवजी गुळाचे सेवन करा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

धूम्रपान आणि मद्यपानाच्या सेवनामुळे रक्तदाब, लठ्ठपणा, साखर अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासूनही दूर राहा. 

वजन नियंत्रणात ठेवा

प्री-डायबेटिस असलेल्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यास तो मधुमेहापासून बऱ्याच अंशी दूर राहू शकतो. हाच नियम मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना लागू होतो. बॉडी मास इंडेक्स (BMI) 18 ते 23 च्या दरम्यान ठेवा. तुमच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget