Health Tips : चणे, शेंंगदाणे खायला तसे सगळ्यांनाच आवडतात. पण, भाजलेले चणे शरीरासाठी रामबाण औषध मानले जातात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज भाजलेले चणे खाल्ल्याने आपलं वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होतेच पण हृदयाचे आरोग्यही सुधारते. प्रथिने, फायबर, मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस, तांबे, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्त्वे भाजलेल्या चण्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून आराम मिळतो आणि अनेक फायदे मिळतात.
 
भाजलेले चणे खाण्याचे फायदे
 
बद्धकोष्ठतेस आराम मिळतो


जर तुम्ही पोटाच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर भाजलेले चणे खा. भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तज्ञ देखील भाजलेल्या चण्यांचा आहारात समावेश करण्यास सांगतात.  
 
तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त


भाजलेले चणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. भाजलेल्या चण्यामध्ये मुबलक प्रमाणात मॅंगनीज, फॉस्फरस, फोलेट आणि तांबे असतात, जे रक्ताभिसरण चांगले ठेवण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून आराम मिळतो 
 
रक्तदाब नियंत्रित करा


चण्यामध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. भाजलेल्या चण्यामध्ये तांबे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम आढळतात. ज्यामुळे सूज कमी होते आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्याचे काम करते. भाजलेले चणे देखील फॉस्फरसचे स्त्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
 
मधुमेहामध्ये फायदेशीर


जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्याच्यासाठी भाजलेले चणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, भाजलेल्या चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते.
 
वजन कमी करण्यास फायदेशीर


जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही.  तसेच, त्यामुळे तुमची पचनशक्तीही मजबूत राहते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा